Corona virus : Wear a mask even if traveling alone in a car, High Court directs
Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 11:28 AM1 / 12महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. 2 / 12कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका, असे दिल्ली हायकोर्टाने खडसावले आहे. 3 / 12एकट्याने खासगी कार चालविताना मास्क घातला नाही म्हणून दंड ठोठावला होता. त्याला आव्हान देणार्या याचिकेवर सुनावणी झाली. 4 / 12न्यायमूर्ती प्रथिबा एम सिंग यांनी सांगितले की, कारमध्ये एकट्याने प्रवास करतानाही मास्क घालणे हा स्वतःच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी असतो. 5 / 12कारण जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलजवळ वाहन थांबवते आणि खिडकीची काच खाली ठेवते. तेव्हा संसर्ग होण्याची शक्यता असते. तुम्ही यास अहंकाराचा मुद्दा बनवू शकत नाही. 6 / 12देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून दिल्लीतही मंगळवारी एकाच दिवसात 5100 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 7 / 12दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी यापूर्वीही एका प्रकरणात असेच आदेश दिले होते. मास्क न घालणाऱ्याला दंड आकारण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 8 / 12वकील सौरभ शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी होती. सप्टेंबर, २०२० रोजी नोकरीसाठी जाताना दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी रोखले आणि मास्क न घालल्याबद्दल 500 रुपयांचा दंड केला.9 / 12 कोरोनाचे संकट गहिरे होत चालले असून, पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. 10 / 12निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. 11 / 12कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसभरात एक लाखांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी बाधितांची संख्या किंचित कमी झाल्याचे आढळून आले. 12 / 12अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा, असेही सूचवले आहे आणखी वाचा Subscribe to Notifications