शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कुणाला, कुणाला होऊ शकतं नुकसान? देशातील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 8:24 PM

1 / 11
एम्स डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की लोक भीती पोटी रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात जमा करत आहेत. त्यांनी म्हटले आहे, की केवळ 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांनाच याची आवश्यकता भासते. तसेच कोविड महामारी हा गंभीर आजार नाही, हे सर्वांना समजायला हवे. हा आजार केवळ 10 ते 15 टक्के लोकांतच गंभीर रुप धारण करतो त्यांना रुग्णालयात नेण्याची आवश्यकता भासते. (Corona who need oxygen and remdesivir in which condition important tips for home isolation and hospitalisation for patients)
2 / 11
ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची गरज कुणाला - गुलेरिया म्हणाले, 'मी असेच म्हणेल, की कोरोना ही महामारी आहे. ते अधिकांश प्रकरणांत एक सामान्य संक्रमण आहे. 90 ते 95 टक्के लेकांत सामान्य ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंग दुखी सारखी लक्षणे असतात. अशा लोकांना ना ऑक्सिजनची गरज भासते, ना रेमडेसिव्हिरची, ना अधिक औषधांची.'
3 / 11
सामान्य लक्षणे असलेल्यांनी काय करायला हवे, यासंदर्भात डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले, 'ताप, सर्दी आदींची औषधे घ्या, घरगुती उपचार करा, वाफ घ्या, योग करा. यातच आपण बरे व्हाल. आपल्याला घरात ना ऑक्सीजन ठेवण्याची आवश्यकता आहे ना रेमडेसिव्हिर. आपण आरामात 8-10 दिवसांत बरे व्हाल.'
4 / 11
अशा परिस्थितीत भासते व्हेंटिलेटर सपोर्टची गरज - डॉ. गोलेरिया म्हणाले, 10-15 टक्के लोकांत गंभीर संक्रमण होऊ शकते. अशा लोकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'अशा लोकांना ऑक्सिजनबरोबरच औषधांचीही आवश्यकता भासू शकते, यात स्ट्रॉयड्स आहे, रेमडेसिव्हिरही आहे, कधी-कधी आम्ही प्लाझ्माही देतो. 5 टक्क्यांहूनही कमी रुग्ण असे असतात, ज्यांना अधिक स्ट्राँग औषधी द्यावी लागते अथवा व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागते.
5 / 11
रेमडेसिव्हिर म्हणजे काही जादूचे औषध नाही, तिच्यामुळे नुकसानही होते - डॉ. गुलेरिया म्हणाले,की पहिली गोष्ट म्हणजे कोरोना व्हायरसने सामान्य संक्रमण होते. 10 ते 15 टक्के लोकांत हे गंभीर होऊ शकते. दुसरी गोष्ट ही, की जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तपासात स्पष्ट होऊ शकते, की रेमडेसिव्हिरने ना रुग्णाचा जीव वाचतो, ना रुग्णालयात भरती राहण्याची वेळ घटते.
6 / 11
गुलेरिया म्हणाले, 'अमेरिकेच्या एका स्टडीत म्हणण्यात आले आहे, की मॉडरेट ते सिव्हियर अर्थात मध्यम ते गंभीर संक्रमण असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर दिली तर त्यांना रुग्णालयातून लवकर सुटी मिळू शकते. लक्षात असू द्या, की माइल्ड म्हणजे सामान्य संक्रमण असेल तर याची आवश्यकता नाही.
7 / 11
...तर त्यांनी रेमडेसिव्हिर घेऊ नये - गुलेरिया म्हणाले, जे रुग्ण स्टेबल आहेत, जे घरी आहेत, ज्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 93-94 पेक्षा अधिक आहे, त्यांनी रेमडेसिव्हिर घेऊ नये. अशा लोकांनी रेमडेसिव्हिर घेतल्यास, त्यांना अधिक नुकसान होऊ शकते. फायदा कमी होईल.
8 / 11
ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी - 'एक गोष्ट म्हणजे, अनेकांना वाटते, की माझे ऑक्सिजन सॅच्युरेशन काल 98 होते आणि आज 97 झाले आहे, याचा अर्थ ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लाकले आहे. यामुळे ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आहे. आपल्याला माहित असायला हवे, की जर आपले ऑक्सिजन सॅच्युरेशन 94, 95, 97 एवढे असेल, तर ऑक्सिजन लावण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही. जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे वाटत असेल, छातीत इन्फेक्शन आहे, असे वाटत असेल, तर दीर्घ श्वास घेण्याची एक्सरसाइज करा. पोटावर झोपा तरीही तुमचे ऑक्सिजन सेच्युरेशन वाढेल,' असे गुलेरिया म्हणाले.
9 / 11
ऑक्सिजन लेवलपासून होम आयसोलेशनपर्यंत... जाणून घ्या काय म्हणतात, डॉ. त्रेहन - या चर्चेवेळी डॉ. नरेश त्रेहन म्हणाले, आरटी-पीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येताच लोकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. असे केल्यास 90 टक्क्यांहूनही अधिक लोक घरच्या घरीच बरे होतील. अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याने रुग्णांना मोठा फायदा होतो. कारण दीर्घ श्वास घेऊन थांबून धरल्याने फुफ्फुसात अधिक प्रमाणावर ऑक्सीजन पोहोचतो. यामुळे फुफ्फूस सशक्त होते.
10 / 11
त्रेहन म्हणाले, की आपल्या घरात आयसोलेशनची व्यवस्थित व्यवस्था होऊ शकत नसेल, तर रुग्णालयांनी जवळच क्वारेंटाइन सेंटर तयार करून ठेवले आहे. आपण तेथे जाऊ शकता. ते म्हणाले, 'आम्ही रुग्णांना तेथे पाठवतो, तेथे डॉक्टर-नर्स रुग्णांवर लक्ष ठेवतात. तेथे रुग्णांचा त्रास वाढला, तर त्याला रुग्णालयात नेले जाते.'
11 / 11
अफवांपासूनदूर रहा, मानसिक दृष्ट्या सशक्त होण्यावर लक्ष द्या - यावेळी एम्समध्ये मेडिसिन डिपार्टमेंटचे एचओडी आणि प्रफेसर डॉ. नवनीत विग आणि भारत सरकारचे आरोग्य सेवा महासंचालक (DG) डॉ. सुनील कुमार यांनीही आपले विचार ठेवले. त्यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने पसरत असलेल्या अफवांपासूनही दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रिकाम्या वेळेत प्रेरणदायी पुस्तके वाचल्यानेही हिंमत वाढते आणि कोरोना विरोधातील लढाईत बळ मिळते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयdocterडॉक्टर