CoronaVirus 26 percent out of total world corona cases found in india in last one week
CoronaVirus News: भारत कोरोनाचं नवं केंद्र?; धडकी भरवणारी, काळजी वाढवणारी आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 3:48 PM1 / 10भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी अतिशय वेगानं वाढत आहे. कोरोनाचा फैलाव आणि रुग्णांची वाढत असलेली संख्या हादरवून टाकणारी आहे. भारत कोरोनाचं नवं केंद्र झाल्याची शक्यता आकडेवारीवरून व्यक्त केली जात आहे. 2 / 10देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत देश जगात तिसऱ्या स्थानी आहे. भारतापुढे केवळ अमेरिका आणि ब्राझील हे दोनच देश आहेत. 3 / 10गेल्या आठवड्याभरात जगात सापडलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.4 / 10वर्ल्डोमीटरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी ३८ लाखांच्या पुढे गेला आहे. यापैकी ८ लाख १७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.5 / 10आतापर्यंत १ कोटी ६३ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या व्यक्तींची संख्या ६६ लाखांपेक्षा जास्त आहे.6 / 10२४ ऑगस्टला जगात कोरोनाचे २ लाख १३ हजार रुग्ण आढळले. या दिवशी भारतात ५९ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली.7 / 10२३ ऑगस्टला जगात २ लाख १० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्या दिवशी भारतात सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या ६१ हजार इतकी होती.8 / 10२२ ऑगस्टला जगभरात २ लाख ६२ हजार कोरोना रुग्ण सापडले. त्यात भारतीयांचा आकडा ७० हजार इतका होता.9 / 10२१ ऑगस्टला जगात २ लाख ५८ हजार रुग्णांची नोंद झाली. त्यातले ६९ हजार रुग्ण एकट्या भारतातले होते.10 / 10२० ऑगस्टला जगभरात २ लाख ६७ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यातील भारतीयांची संख्या ६८ हजार होती. आणखी वाचा Subscribe to Notifications