शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: कोरोनाची लाट खरंच ओसरतेय? 'ही' आकडेवारीनं देशाची चिंता वाढवतेय

By कुणाल गवाणकर | Published: October 12, 2020 5:09 PM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७१ लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी १ लाख ९ हजार १५० जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 10
सध्याच्या घडीला देशात ८ लाख ६१ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ६१ लाखांहून अधिक आहे.
3 / 10
कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आठपट आहे. काही दिवसांपूर्वी देशात दररोज कोरोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आता हाच आकडा ७० हजारांच्या खाली आला आहे.
4 / 10
देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मात्र पाच राज्यांमधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे.
5 / 10
महाराष्ट्रात आजही दररोज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात दररोज सरासरी १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येतात. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १५ लाख २७ हजार ८६१ वर पोहोचला आहे.
6 / 10
महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील स्थितीदेखील चिंताजनक आहे.
7 / 10
राजधानी दिल्लीत काल २ हजार ७८० कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा ३ लाख १० हजारांवर पोहोचला. दिल्लीचा रिकव्हरी रेट ९१ टक्के इतका आहे.
8 / 10
कर्नाटकात काल कोरोनाचे ९ हजार ५२३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातल्या बाधितांची संख्या ७ लाख १० हजारांवर गेली. सध्याच्या घडीला कर्नाटकात जवळपास सव्वा लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
9 / 10
उत्तर प्रदेशात काल ३ हजार ३४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. राज्यात सध्या ४० हजारांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३ लाख ९० हजार ५६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
10 / 10
तमिळनाडूत काल ५ हजार ६४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा साडे सहा लाखांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या