CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 10:25 PM1 / 7कोव्हॅक्सीनच्या बूस्टर डोसने चाचण्यांमध्ये 'कोणत्याही गंभीर प्रतिकूल घटनांशिवाय दीर्घकालीन सुरक्षितता' दर्शवली आहे, असे भारत बायोटेकचे म्हणणे आहे. 'ज्या व्हॉलंटियर्सना कोव्हॅक्सीनचा बूस्टर डोस देण्यात आला, त्यांपैकी 90 टक्के लोकांनी वाइल्ड टाइप स्ट्रेनपासून बचावासाठी अँटीबॉडीज विकसित केल्या आहेत. या अँटीबॉडीज मोजल्याही जाऊ शकतात,' असे भारत बायोटेकने म्हटले आहे.2 / 7कंपनीने म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरूद्ध हे मोठे यश आहे. या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणीत, बूस्टर डोसनंतर कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत. तसेच, ज्यांना डोस देण्यात आला त्यांच्यात व्हायरसपासून दीर्घकाळ संरक्षण करण्याची क्षमताही दिसून आली आहे.3 / 7कंपनीने गेल्या महिन्यात खुलासा केला होता, की त्यांची कोरोनाव्हायरस लस 'फेज दोन आणि तीनच्या चाचण्यांमध्ये 2 ते 18 वर्षे वयोगटातील व्हॉलंटियर्स'मध्ये सुरक्षित आणि रोगप्रतिकारक सिद्ध झाली आहे.4 / 7भारत बायोटेकने 2 ते 18 वर्षे वयोगटातील निरोगी बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोव्हॅक्सीनची सुरक्षितता, सुरक्षा, प्रतिक्रियाशीलता आणि प्रतिकारशक्ती यांचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी II/III, ओपन-लेबल आणि मल्टीसेंटर स्टडीचे आयोजन केले होते.5 / 7देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरण कार्यक्रम 3 जानेवारी 2022 पासून सुरू झाला आहे. 6 / 7केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केल्यानुसार, या श्रेणीत केवळ 'कोव्हॅक्सीन' लसच दिली जाईल. तसेच, 'कोव्हॅक्सीन'चे अतिरिक्त डोस सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले जातील.7 / 7मुंबईत तिसऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण - महाराष्ट्रता कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे केंद्रस्थान बनत चालली आहे. मुंबईत काल आणि आजही तब्बल 20 हजारांवर रुग्णांची नोंद झाली. आज पुन्हा दिवसभरात मुंबईत 20,318 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications