coronavirus: या राज्यात कोरोना तपासणीमध्ये मोठा घोटाळा, रॅपिट अँटिजन टेस्ट किटमध्ये कोट्यवधीची अफरातफर By बाळकृष्ण परब | Published: February 21, 2021 3:46 PM
1 / 7 कोरोना विषाणूच्या फैलावामुळे गेल्या वर्षभरापासून देशातील जनता त्रस्त आहे. यादम्यान, कोरोनाकाळात विविध प्रकारचे घोटळेही समोर येत आहेत. 2 / 7 आतातर बिहारमध्ये चक्क कोरोना तपासणीमध्येच मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट किटमध्ये कोट्यवधीची अफरातफर झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ज्यांची कोविड-१९ चाचणी झाली आहे. अशांच्या तपासामध्ये केवळ तीन विभागातील आरोग्य केंद्रात तब्बल ३० हजार जणांचे मोबाइल क्रमांक खोटे असल्याचे उघड झाले आहे. अशांच्या मोबाइल क्रमांकाच्या जागी ०००००००००० आणि ११११११११११ असे लिहिलेले दिसून आले. हा कोरोना चाचणी किट घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 3 / 7 सीतामढीमधील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य विभागाने कोरोना चाचणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे. आरोग्य विभागाने कोरोनाच्या तपासणीचे खोटे आकडे प्रसिद्ध केले आहेत. सीतामढीमधील रुनीसैदपूर, डुमरा, रीगा या केवळ तीन आरोग्य केंद्रामधून जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये ३०००० हजार जणांच्या नावाचे खोटे मोबाइल क्रमांक मिळाले आहे. 4 / 7 जिल्ह्यात एकूण ३ लाख ६३ हजार जणांची कोरोना चाचणी झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र केवळ तीन ठिकाणांच्या आकडेवारीनुसार सुमारे ३० हजार जणांचे खोटे आकडे दिले गेले. त्यानुसार २ कोटी ८० लाखांच्या किटमध्ये अफरातफर झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांचे आकडे मिळवल्यास ही संख्या एक लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. 5 / 7 सुरुवातील कोरोनाच्या अँटिजन किटची किंमत ३ हजार ५०० रुपयांच्या आसपास होती. मात्र नंतर ही किंमत ९९ रुपयांपर्यंत खाली आली. संपूर्ण जिल्ह्यात सुमारे एक लाख खोट्या कोरोना चाचण्या झाल्या, असे समजल्यास एका किटचे ९०० रुपये या प्रमाणे ९ कोटी ३३ लाख रुपयो होतात. एकंदरीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अफारतफर झाली. 6 / 7 उदाहरण द्यायचं झाल्यास डुमरामधील आनंद विहारी सिंह यांचे नाव कोरोनाची चाचणी झालेल्यांच्या यादीत आहे. त्यांनी दोन वेळा कोरोना चाचणी केली होती. मात्र प्रत्यक्षात सरकारी आकड्यांमध्ये त्यांनी तीन वेळा कोरोना चाचणी केल्याची नोंद आहे. 7 / 7 अशा प्रकारे हजारो लोकांची नावे कोरोनाची चाचणी करणाऱ्यांच्या यादीत खोट्या पद्धतीने नोंद करण्यात आली आहेत. याबाबत रुन्नीसैदपूरमधील रॅपिड अँटिजन किट घोटाळ्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अमृत किशोर यांना विचारले असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितले की, ज्यांनी मोबाइल क्रमांक दिले नाहीत त्यांच्यामुळे असे झाली आहे. दरम्यान, या प्रकारावरून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने सरकारवर टीका केली आहे. आणखी वाचा