शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाऊनमध्ये ATM मध्ये जायचे नाहीय? बँकाच घरी आणून देणार कॅश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 6:12 PM

1 / 10
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांनी रात्री ८ वाजताच किराना दुकाने, भाजीपाला गाड्यांसमोर गर्दी केली होती. रांगा लागल्याचे चित्र देशभर दिसत होते.
2 / 10
अखेर राज्याचे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवणार असल्याचे आवाहन केले होते. तर काही राज्यांनी घरपोच दूध, अन्नधान्य देण्याची घोषणा केली होती. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील.
3 / 10
ATM मध्ये पुरेसे पैसे आहेत. बँकाही सुरु राहणार आहेत. पण घराबाहेर पडल्यास पोलिसांचा मार खावा लागत असल्याने अनेकजण घरातच थांबलेले आहेत. हे चांगलेच आहे. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी सूट दिलेली आहे.
4 / 10
अनेकांच्या बँक खात्यामध्ये पैसे आहेत पण घरात काढून ठेवलेले नाहीत. यामुळे ऐन गरजेच्या वेळेला पैसे लागतीलच. अनेक ठिकाणची किराणामालाची दुकानेही व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने बंद ठेवली आहेत. काही जण दोन, चार तासांसाठीच उघडत आहेत.
5 / 10
तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही पैसे घरीही मागवू शकता. कोण देणार? अहो बँकच देणार. ते ही घरात आणून. पहा कसे शक्य आहे ते.
6 / 10
लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आवश्यक सेवा सुरु ठेवणार आहेत. एसबीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि अॅक्सिस बँका त्यांच्या ग्राहकांना कॅश डिलिव्हरी करण्याची सुविधा देतात.
7 / 10
देशातील सर्वात मोठी बँक SBI तुमच्या घरी कॅश पोहोचविण्याची सुविधा देते. एवढेच नाही तर एसबीआय तुमच्या घरी येऊन पैसे जमा करण्याचीही सुविधा देते.
8 / 10
मेडिकल इमरजन्सीवेळी एसबीआय ग्राहकाला १०० रुपयांचे शुल्क आकारते. या सुविधेचा लाभ उठवून तुम्ही या वेगळ्या सेवेचा लाभ घेऊ शकता.
9 / 10
HDFC बँकही तिच्या खातेधारकांना घरी कॅश देण्याची सुविधा देते. यासाठी कॅश लिमिट ५ ते २५००० रुपये एवढे आहे. यासाठी रकमेनुसार १०० ते २०० रुपये आकारले जातात.
10 / 10
अॅक्सिस बँक आणि कोटक बँकही घरपोच पैसे देण्याची सुविधा पुरवितात.
टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रSBIएसबीआयhdfc bankएचडीएफसी