Coronavirus: Chances of third wave “very low”: ICMR scientist Dr Raman Gangakhedkar
Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळला?; ICMR च्या वैज्ञानिकाने चिंता मिटवली, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 1:35 PM1 / 10संपूर्ण जगात गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले. चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोनानं सामान्य माणसाचे आयुष्य बदलून टाकले. कोरोना व्हायरस अद्यापही आटोक्यात नाही. 2 / 10कोरोना(Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्रत्येक देश लसीकरण मोहिमेवर भर देत आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागेल असं वारंवार सरकारकडून सांगण्यात येते. त्यात कोरोनाच्या येणाऱ्या वेगवेगळ्या नव्या व्हेरिएंटने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. 3 / 10कोरोनाची पहिली लाट संपली, त्यानंतर दुसरी लाट सुरू आहे इतक्यात तिसरी लाट धडकणार असल्याचा इशारा अनेक तज्ज्ञ देत आहेत. परंतु ICMR चे माजी वैज्ञानिक डॉ. रमन गंगाखेडकर यांनी देशात कोरोना व्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे असं सांगितल्याने लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 4 / 10तसेच जर तिसरी लाट आलीच तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा खूप कमकुवत असेल. शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घ्यायला नको. कारण लहान मुलांवर कोविड १९ चा प्रभाव खूप कालावधीपर्यंत राहतोय असं नव्या स्टडीत आलं आहे. त्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय घेताना विचार करण्याची गरज असल्याचं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. 5 / 10अनेक शास्त्रज्ञ मानतात की, कोविड १९ यापुढे जाऊन इन्फ्लूएंजा व्हायरसप्रमाणे बनू शकतं. लसीकरणानंतर ज्यांना कोविड १९ ची लागण होईल त्यांना लक्षणं दिसणार नाहीत परंतु माइल्ड सिम्पटम दिसतील. त्यामुळे लसीकरणानंतरही मास्क घालणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचे आहे. 6 / 10लसीकरणानंतरही संक्रमणाची संख्या वाढत राहील कारण लसीकरण स्टरलाइजिंग इम्युनिटी देत नाही जी संक्रमण रोखू शकतं. लसीचे डोस केवळ डिसीज मोडिफाइंग आहेत. संक्रमणापासून वाचवू शकत नाही परंतु त्याचा धोका कमी करण्यासाठी दिले जातात असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. 7 / 10जोपर्यंत कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरिएंट येत नाही अथवा लसीकरणचा प्रभाव कमी होत नाही तोवर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने घाबरण्याची गरज नाही. व्हायरस अशा भागात पसरेल ज्याठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी जाणवला असेल. 8 / 10व्हायरस अशा व्यक्तींना टार्गेट करेल ज्यांनी आतापर्यंत लसीचा कुठलाही डोस घेतला नाही. कोविड १९ ने आपल्याला खूप काही शिकवलं. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. कोविड १९ संबंधित निर्णयामुळे कुठलाही निर्णय कायमचा होऊ शकत नाही. 9 / 10कुठला निर्णय चांगला सिद्ध होईल, कुठला निर्णय अजिबात काम करणार नाही. आपल्याला कायम शिकत राहावं लागणार आहे. तसेच आपल्या दृष्टीकोनात नेहमी बदल करत राहावे लागणार आहे असंही ICMR चे माजी वैज्ञानिक डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. 10 / 10मागील २४ तासांत भारतात २७ हजार २५४ कोरोना रुग्ण आढळले. भारतात आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ रुग्ण आढळले त्यातील ३ कोटी २४ लाख ४७ हजार ०३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर ४ लाख ४२ हजार ८७४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications