1 / 8देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत चालली आहे. दोन अडीच महिन्यांपूर्वी भारतात कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये आढळत होते. मात्र आता शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रकोप ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. 2 / 8देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत चालली आहे. दोन अडीच महिन्यांपूर्वी भारतात कोरोनाचे रुग्ण हे परदेशातून आलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये आढळत होते. मात्र आता शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रकोप ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. 3 / 8राजस्थानसारख्या राज्यात स्थलांतरित मजुरांच्या आगमनानंतर नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येऊ लागला आहे. पण हे चित्र केवळ राजस्थानपुरते मर्यादित नाही.4 / 8देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला तरी येथील कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे शहरी भागात मर्यादित होते. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या मर्यादित होती. मात्र आता ग्रामीण भागातही शहरी किंवा निमशहरी भागांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 5 / 8ओदिशामध्ये आतापर्यंत 4.5 लाख स्थलांतरित मजूर पोहोचले आहेत. दरम्यान, सध्या सापडत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथील गंजम जिल्ह्यात दोन मेपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र आता तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 6 / 8उत्तर प्रदेशात सुमारे ३० लाख स्थलांतरित मजूर दाखल झाले आहेत. त्यासोबत कोरोनाचा संसर्गही पोहोचला आहे. त्यामुळे बस्ती, अमेठीसारख्या छोट्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. २ जूनपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३३२४ कोरोनाचे अँक्टिव्ह रुग्ण होते. त्यापैकी ७० टक्के रुग्ण हे प्रवासी मजूर आहेत. 7 / 8आंध्र प्रदेशमध्ये महिनाभरापूर्वीपर्यंत कोरोनाचे सुमारे ९० टक्के रुग्ण शहरी भागात सापडत होते. मात्र आता ग्रामीण भागातून कोरोनाबाधित समोर येण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. स्थलांतरित मजुरांमुळे हे प्रमाण वाढल्याचा दावा अधिकारी करत आहेत. 8 / 8दरम्यान, देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आता रोज आठ ते नऊ हजार नवे रुग्ण सापडत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान अधिकच खडतर झाले आहे.