coronavirus cure india to start plasma therapy kerala first off the block SSS
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी भारतात लवकरच 'या' थेरपीचा होणार वापर By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 2:58 PM1 / 15कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 134,685 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे.2 / 15कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत.3 / 15कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.4 / 15भारतात लवकरच कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले जाऊ शकतात. सध्या भारतीय शास्त्रज्ञ यावर संशोधन करत असल्याची माहिती मिळत आहे. 5 / 15प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.6 / 15इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे.7 / 15प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.8 / 15जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.9 / 15काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते. 10 / 15चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनदेखील त्याची चाचणी घेत आहेत. या भारतही हा थेरपीचा वापर करण्याचा विचार करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 15प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोनावर उपचार करण्याचा विचार करणार्या रुग्णालये आणि संस्थांना प्रथम संस्थाविषयक एथिक्स कमिटी (IEC) प्रोटोकॉल अंतर्गत क्लिनिकल चाचण्या घेणे आवश्यक आहे. 12 / 15चाचणी सुरू करण्यापूर्वी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (DCGI) परवानगी घ्यावी लागते. याशिवाय, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियामध्ये रुग्णालये नोंदवणे देखील आवश्यक आहे.13 / 15केरळ हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने प्लाझ्मा थेरपीवर संशोधन आणि प्रोटोकॉल सुरू केले आहेत. श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी (SCTIMST) यांना आयसीएमआरने 11 एप्रिल रोजी प्लाजमा थेरपीच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे. 14 / 15डीसीजीआय (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) कडून ग्रीन सिग्नल अद्याप मिळालेला नाही. रक्तदात्यासंदर्भात डीसीजीआयने बरेच नियम तयार केले आहेत, जसे की रक्तदात्याकडे गेल्या तीन महिन्यांत परदेशी प्रवासाची नोंद असू नये.15 / 15चाचणीसाठी नियम शिथिल करण्याचे आवाहन एससीटीआयएमएसटीने केले आहे. दिल्लीमध्ये प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्याची तयारीही सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications