Corona Spreading: देशभरात कोरोना पसरवण्यात दिल्ली अव्वल, मुंबई दुसऱ्या स्थानावर; पाहा, टॉप-10 शहरांची यादी By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 2:03 PM1 / 10पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एजुकेशन अँड रिसर्चने (IISER) ज्या शहरांत कोरोना महामारी वेगाने पसरण्याचा धोका असतो, त्या शहरांसंदर्भात एक मॅप तयार केला आहे. IISER च्या या अभ्यासात दिल्ली अव्वल स्थानावर आहे. (CoronaVirus Delhi tops the list in terms of corona spreading these are the top 10 cities)2 / 10दिल्लीनंतर, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. तर या यादीत पुणे 10व्या क्रमांकावर आहे.3 / 10IISERने आपल्या या मॅपमध्ये एक लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण 446 शहरांना स्थान दिले आहे. 4 / 10IISER च्या फिजिक्स डिपार्टमेंटने हा मॅप तयार करण्यासाठी ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क आणि मोबिलिटी पॅटर्नचा वापर केला आहे. या अंतर्गत, ज्या शहराचा रँक सर्वात कमी तेथे महामारी पसरण्याचा धोका सर्वा जास्त असतो.5 / 10रिसर्च केलेल्या वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, या शहरांत ट्रांस्पोर्ट व्यवस्था मोठी असल्याने अनेक ठिकाणांना जोडली गेलेली असते. यामुळे व्हायरसचे संक्रमण बाहेरही पसरू शकते. 6 / 10IISER चे संशोधक, एमएस सन्थानम यांनी म्हटले आहे, की 'व्हायरस किती घात आहे आणि तो सर्वप्रथम कोठे पसरला? यावर व्हायरसचा प्रसार कमी अवलंबून असतो. तर, त्या शहरातील ट्रांस्पोर्ट मोडवर तो अधिक अवलंबून असतो. कारण यामुळे हे संक्रमण दूरवर पसरते.7 / 10IISER ने आपल्या या प्रोजेक्टमध्ये मोबिलिटी आणि ट्रांस्पोर्ट डाटाचाही वापर केला आहे. यानुसार, एखाद्या दुसऱ्या शहरात महामारी पसरल्यास, या शहरांना किती धोका होईल, या आधारे त्यांना स्कोर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जर पुण्यात महामारी पसरली, तर मुंबई संक्रमण प्रसाराच्या यादीत सर्वात पुढे असेल. याबाबतीत महाराष्ट्रातील सातारा शहर 19व्या आणि लातूर 50 व्या स्थानावर असेल.8 / 10मॅपमागील विज्ञानावर बोलताना IISER टीमचे सदस्य ओंकार सादेकर म्हणाले, 'हे अत्यंत सोप्या सिद्धांतावर काम करते. लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करणे संक्रमाच्या प्रसाराला जबाबदार असते. आपण लोकांच्या रोजच्या प्रवासासंदर्भात माहिती मिळवल्यास या संक्रमणाच्या प्रसाराची भौगोलिक स्थिती समजू शकतो.'9 / 10टीममधील आणखी एक सदस्य सचिन जैन यांनी म्हटले आहे, की 'जर एका शहरात एखादा संक्रामक आजार आला, तर तो दुसऱ्या शहरात पसरायला किती वेळ लागेल, या वेळेची माहिती मिळवून आपण वेगवेगळ्या शहरांना रँक देऊ शकतो.'10 / 10ज्या शहरात प्रसाराचा कालावधी सर्वात जास्त असेल, त्याचा रँक सर्वात कमी असेल. या ठिकाणांची माहिती झाल्यास आपण याचा वापर येथील ट्रांस्पोर्ट ब्लॉक करण्यासाठी करू शकतो. यामुळे संक्रमणाचा प्रसार रोखला जाऊ शकेल, असेही जैन म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications