शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: माणुसकीचा धर्म! कोरोनामुळे वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाचा नकार; मुस्लीम युवकाने केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 9:57 AM

1 / 10
बिहारच्या दरभंगा येथे अशी घटना घडली आहे. ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाने वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा मुस्लीम युवकाने मुलाचं कर्तव्य निभावून त्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
2 / 10
बिहारच्या दरभंगा येथे एका व्यक्तीचा कोरोनामुळे जीव गेला. त्यानंतर मयताच्या मुलाने मतदेह ताब्यात घेण्यास नकरा दिला. हॉस्पिटल प्रशासनाने मुलाला सूचना दिली परंतु त्यानंतर मुलाने मोबाईल बंद करून घेतला. तेव्हा कबीर संस्थानाने माणुसकीच्या नात्याने या वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. एका मुस्लीम युवकाने मुलाचं कर्तव्य निभावत हिंदू प्रथा परंपरेनुसार व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.
3 / 10
हा संपूर्ण प्रकार दरभंगाच्या DMCH हॉस्पिटलमधील आहे. जेथे रेल्वेतून निवृत्त झालेल्या व्यक्तीचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला. हॉस्पिटलने याची सूचना मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिली. मनुष्यबळ कमी असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाने नकार दिला. तसं पत्र त्याने हॉस्पिटल प्रशासनाला दिलं.
4 / 10
यानंतर मुलाने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला आणि तेथून निघून गेला. मृतक व्यक्ती पीडारुच गावातील रहिवाशी होता. त्याच्या मागे ३ मुलं आणि पत्नी आहे. मात्र १ मुलगा सोडला तर घरातील सर्व सदस्य कोरोना संक्रमित आहेत. जेव्हा मुलाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तेव्हा हॉस्पिटलने कबीर सेवा संस्थानला याची कल्पना दिली.
5 / 10
यानंतर कबीर सेवा संस्थेतील सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. हिंदू प्रथा परंपरेनुसार या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणुसकीच्या नात्याने एका मुस्लीम युवकाने मुलाचं कर्तव्य निभावत सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या.
6 / 10
मृतदेहाच्या अंत्यसंस्कारानंतर होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद उमरने व्हिडीओ जारी केला. त्याने सांगितले की, तपास रिपोर्टनंतर त्याने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. कारण इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये. त्याचसोबत कोरोनाला घाबरू नका. नियमावलींचे पालन करा त्याच्या लढता येते असं तो म्हणाला.
7 / 10
उमर म्हणाला की, कोरोनाच्या दहशतीमुळं मुलाने आपलं कर्तव्य निभावलं नाही. परंतु संस्थेच्या लोकांना माणुसकीचा धर्म निभावला. मी मुस्लीम असल्याने हिंदू प्रथा परंपरेनुसार इतरांच्या मदतीने मी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.
8 / 10
महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवडाभरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत राज्यात २ हजार १०० कोरोनाबळींची नोंद झाली.
9 / 10
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार देशातील सर्व राज्यांत ११ ते १४ एप्रिल काळात लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविण्यात येणार आहे. रविवारी महात्मा फुले यांची आणि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे या काळात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले होते.
10 / 10
मुंबईत दैनंदिन रुग्णांत १५ टक्क्यांची घट झाली. १० हजार रुग्णांची नोंद काही दिवसांपूर्वी सलग होत होती, ती आता ८,९३८ वर आली आहे. केंद्राकडून मुंबईत आलेल्या विशेष पथकाने येथील विलगीकरण व्यवस्था, लसीकरणाचे व्यवस्थापन उत्तम असल्याचे सांगितले. मुंबईत दिवसभरात ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या