Coronavirus: भारतात 'Omicron' रुग्णांचा खरा आकडा स्पष्ट होत नाही; समोर आलं खरं कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:34 PM
1 / 12 देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली असून मागील २४ तासांत जवळपास २ लाखांच्या आसपास कोविड रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णसंख्येला कोरोनाचा ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट जबाबदार असल्याचं मानलं जातं आहे. 2 / 12 आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, दिल्ली, मुंबईत जितके रुग्ण आढळत आहेत. त्यातील ९० ते ९५ टक्के ओमायक्रॉन संक्रमित आहेत. परंतु आरोग्य मंत्रालय ओमायक्रॉन रुग्णांची अपडेट देते तेव्हा ५०० पेक्षा कमी रुग्ण आढळतात. मग अखेर देशात ओमायक्रॉन किती पसरला आहे हे कळणार कसं? असा प्रश्न निर्माण होतो. 3 / 12 गेल्या २४ तासांत कोरोनाचे १.९४ लाख रुग्ण आढळले. याच काळात ओमायक्रॉनचे ४०७ रुग्ण आढळले. म्हणजे मागील २४ तासांत जितके कोरोना रुग्ण आढळले त्यातील ०.२ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असतील. तर हा नेमका घोळ का आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? हेच जाणून घेऊया 4 / 12 ICMR च्या नव्या नियमांनुसार, कोरोना संक्रमितांच्या संपर्कात येणाऱ्या कोविड टेस्ट करण्याची गरज नाही. केवळ वृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांना चाचणी करावी लागेल. त्याशिवाय बहुतांश राज्यात RTPCR ऐवजी रॅपिड अँटिजेन चाचणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. 5 / 12 दिल्लीचं उदाहरण घेतले तर मागील २४ तासांत याठिकाणी ८३ हजार चाचण्या झाल्या. त्यातील २६ टक्के चाचण्या अँटिजेन चाचण्या होत्या. म्हणजे प्रत्येक ४ मधील १ चाचणी अँटिजेन चाचणी आहे. ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळतात असं सांगितलं जातं. 6 / 12 दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही हेच होत आहे. महाराष्ट्र सरकारने मागच्या आठवड्यात सांगितले की, सर्वांची RTPCR चाचणी करणं शक्य नाही. त्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणी होते. याच अँटिजेन चाचणीत सौम्य लक्षणं सहजपणे पकडू शकत नाहीत. 7 / 12 जर कुणी ओमायक्रॉन संक्रमित असेल तर अँटिजेन चाचणीत त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता फार कमी असते. त्याशिवाय ओमायक्रॉनची पुष्टी करण्यासाठी जीनोम सिक्वेसिंग करावं लागते. परंतु देशात सध्याच्या घडीला ४० हून कमी लॅब आहेत जिथे जीनोम सिक्वेंसिंग होते. 8 / 12 अशावेळी जर राज्य सरकारने पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले तर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी आठवडा किंवा १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. इतक्या दिवसांत ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण बरा होऊन घरीही जातो. 9 / 12 जागतिक आरोग्य संघटनेनुसार(WHO) जगात डेल्टाची जागा आता ओमायक्रॉन घेत आहे. गेल्या ३ ते ९ जानेवारी दरम्यान जगात कोरोनाचे १.५ कोटी रुग्ण आढळून आले. इतकचं नाही तर WHO ने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यूरोपात ओमायक्रॉनचे ७० लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्याचं सांगितले. 10 / 12 कोणताही व्यक्ती ओमायक्रॉन संक्रमित आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी केवळ जीनोम सिक्वेंसिंगचा पर्याय आहे. जीनोम सिक्वेसिंगचा रिपोर्ट येण्यासाठी आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. अलीकडेच झारखंड सरकारने केंद्राला लवकरात लवकर जीनोम सिक्वेसिंगचा रिपोर्ट देण्याचं आवाहन केले होते. 11 / 12 झारखंड सरकारच्या म्हणण्यानुसार, आता सॅम्पल भुवनेश्वरला पाठवले जातात. ज्याठिकाणाहून रिपोर्ट येण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. जीनोम सिक्वेंसिंगचा रिपोर्ट येण्यास उशीर होत असल्याने राज्य सरकारसमोर मोठी समस्या उभी राहते. 12 / 12 देशात सध्या ४० हून कमी लॅब आहेत ज्याठिकाणी जीनोम सिक्वेसिंग होतं. केंद्र सरकारने अलीकडेच टाटा इन्सिट्यूटनं बनवलेल्या Omisure टेस्टिंग किटला मंजुरी दिली. या किटच्या सहाय्याने ४ तासांत रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळत होती. आणखी वाचा