CoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:25 IST
1 / 14कोरोना व्हायरसमुळे जगासमोर महामंदीचे संकट घोंगावू लागले आहे. यामुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असून यामुळे मोठे तणावाचे वातावरण आहे. मात्र, अशा या मंदीच्या वातावरणातही गेल्या काही आठवड्यांत मोठमोठ्या कंपन्यांनी जवळपास दोन लाख जागांसाठी जाहिराती दिल्या आहेत.2 / 14 यामध्ये गुगल, अॅमेझॉन, टेक महिंद्रा, वॉलमार्ट लॅब्स, आयबीएम, कॅपजेमिनी, डेलॉईट, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसारख्या कंपन्यांचा समावेश आहे3 / 14कर्मचारी पुरविणारी कंपनी एक्सफेनोकडून ईकॉनॉमिक्स टाईम्ससाठी एकत्र करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास ८०००० नोकऱ्या या एन्ट्री लेव्हलसाठी आहेत. यामुळे मंदीच्या काळात नोकऱ्या जात असताना नव्या नोकऱ्या शोधणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. ४० टक्के नोकऱ्या ज्युनिअर लेव्हल आणि मिड सिनिअर लेव्हलवर आहेत. 4 / 14दोन लाखांपैकी ९१ टक्के नोकऱ्या या पूर्णवेळ असणार आहेत. तर उर्वरित कंत्राटी आणि पार्ट टाईम असणार आहेत. यामध्ये ७९ टक्के नोकऱ्या या आयटी आणि त्याच्याशी संबंधीत क्षेत्रांतील आहेत. तर १५ टक्के नोकऱ्या ई-कॉमर्स आणि बीएफएसआयच्या आहेत. 5 / 14सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर्, सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रोग्रॅमर, आणि फुल स्टॅक डेव्हलपर्ससाठी सर्वाधिक जाहिराती आहेत. नॉन टेक्निकल जागांमध्ये विक्री प्रतिनिधीसाठी नोकऱ्या जास्त आहेत. 6 / 14काही कंपन्यांच्या एचआर हेडनी सांगितले की, लॉकडाऊन संपल्यावर कंपन्यांचे काम पुन्हा सुरु होईल. यावेळी कर्मचाऱ्यांची मोठी गरज लागणार आहे. यासाठी नोकरी अर्ज करण्याची संधी सुरुच ठेवण्यात आली आहे. 7 / 14डेलॉयटच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कर्मचारी घेणे बंद केलेले नाही, पण अनिश्चिततेच्या काळात वेग कमी झाला आहे. कंपन्यांना येत्या काळासाठी तयार रहावे लागेल. 8 / 14कॅपजेमिनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आमच्या योजना आणि क्लायंटची मागणी यानुसार नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरु ठेवणार आहोत. भरतीला फ्रेशर्स आणि अनुभवी यामध्ये विभागणी करण्यात येईल. 9 / 14मात्र, स्टार्टअपमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी कमी झाली आहे. ज्यांचा व्यवसाय स्थिरस्थावर झाला आहे त्यांनी भरतीसाठी जाहिरात दिली आहे. 10 / 14टेक महिंद्राने सांगितले की, आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्येच शोध घेत असून आणखी खास कौशल्यांसाठी बाहेरून भरती केली जात आहे. 11 / 14ऑनलाईन ग्रॉसरी कंपनी बिगबास्केटच्या लॉजिस्टिक विभागात १०००० पदे रिकामी आहेत. तर ग्रोफर्सही मोठ्या प्रमाणावर भरती करणार आहे.12 / 14लॉकडाऊनमुळे गेमिंग, शिक्षण, डिजिटल कंटेंट आणि ओटीटी कंपन्यांमध्ये जागा भरण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 13 / 14लॉकडाऊनमुळे गेमिंग, शिक्षण, डिजिटल कंटेंट आणि ओटीटी कंपन्यांमध्ये जागा भरण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 14 / 14लॉकडाऊनमुळे गेमिंग, शिक्षण, डिजिटल कंटेंट आणि ओटीटी कंपन्यांमध्ये जागा भरण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.