coronavirus hitech sanitization machines from japan sanitizing delhi red and orange zone vrd
हायटेक जपानी मशिन्सच्या सहाय्यानं दिल्लीत रेड अन् ऑरेंज झोनमध्ये सॅनिटायझेशन; जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 3:43 PM1 / 12कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे दिल्ली सरकारने रेड आणि ऑरेंज झोनचे सोमवारी सॅनिटायझेशनला सुरुवात केली आहे. 2 / 12दिल्लीतल्या राजेंद्रनगर येथून सुरू करण्यात आलेल्या या फवारणीसाठी सरकारने जपानी हाय-टेक मशीन वापरल्या आहेत. 3 / 12पीआय इंडस्ट्रीजकडून अशा प्रकारची दहा मशिन्स दिल्ली सरकारला देण्यात आली आहेत. एक मशीन दर तासाला सुमारे 20 हजार चौरस मीटर क्षेत्र सॅनिटायझेशन करते. 4 / 12यामुळे दिवसभर सरकारला मोठ्या प्रमाणात विविध भागांमध्ये फवारणी करता येणार आहे. 5 / 12अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारने दिल्ली जल बोर्डाच्या मशीन्सही फवारणीच्या कामाला वापरण्यास सुरुवात केली आहे. 6 / 12सोमवारी सकाळपासून दिल्लीच्या रेड झोन आणि हाय रिस्क झोनचे सॅनिटायझेशन 60 मशीनद्वारे केले जात आहे. 7 / 12विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता ही मोहीम सुरूच राहणार आहे. 8 / 12मोहिमेची सुरुवात करताना स्थानिक आमदार आणि दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चढ्ढा म्हणाले की, दिल्ली सरकार कोरोनापासून राजधानीला मुक्त करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे. 9 / 12हाय-टेक जपानी मशीनद्वारे रेड आणि ऑरेंज झोनचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. 10 / 12विशेष म्हणजे, दिल्ली सरकारने रेड झोन म्हणून त्या भागांची ओळख पटविली आहे, जिथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णानंतर सीलबंद करण्यात आले आहे. 11 / 12संवेदनशील आणि कनेक्ट केलेले क्षेत्र संक्रमणाच्या दृष्टिकोनातून ऑरेंज झोन म्हणून ओळखले गेले आहेत.12 / 12संवेदनशील आणि कनेक्ट केलेले क्षेत्र संक्रमणाच्या दृष्टिकोनातून ऑरेंज झोन म्हणून ओळखले गेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications