coronavirus: How effective is plasma therapy in India? The doctor says ...
coronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी? डॉक्टर म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 9:47 AM1 / 10गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या संशोधनानंतरही या आजारावर कुठलेली औषध सापडलेले नाही. प्रत्येक देश या आजारावर लवकरात लवकर औषध विकसित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, कोरोनावर उपाय म्हणून प्लाझ्मा थेरेपी कितपत उपयुक्त ठरू शकते याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे. 2 / 10दरम्यान, दिल्लीतील एम्समध्ये झालेल्या प्लाझ्मा थेरेपीच्या चाचणीमधून काही धक्कादायक परिणाम समोर आले आहेत. दिल्लीमध्ये सर्वात आधी कोरोना चाचणी सुरू झाली होती. तसेच कोरोनाच्या पीडित रुग्णांना याचा फायदाही झाला होता. त्यानंतर प्लाझ्मा थेरेपीच्या उपयुक्ततेबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आयसीएमआरने प्लाझ्मा थेरेपीच्या वापराला स्थगिती दिली होती आणि त्यावरील संशोधनाबाबत संकेत दिले होते. 3 / 10सध्या देशातील ३८ केंद्रांमधून प्लाझ्मा थेरेपीबाबत संशोधन सुरू आहे. मात्र त्याबाबतचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. दिल्लीतील एम्समध्येही प्लाझ्मा थेरेपीबाबत संशोधन सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपी हा कोरोनावरील फारसा उपयुक्त उपचार नाही, अशी माहिती त्यामून समोर आले आहे. 4 / 10चाचणीदरम्यान कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरेपी फारशी यशस्वी ठरलेली नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या थेरेपीचे कुठलेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, त्याबाबतीत ही चाचणी पूर्णपणे सुरक्षित दिसून आली आहे. 5 / 10 जोपर्यंत आपण रुग्णाच्या सबसेटची वैशिष्टे समजून घेतो, तोपर्यंत आपण प्लाझ्मा थेरेपीचा वापर खबरदारी घेऊनच केला पाहिजे, असा सल्ला डॉ. मनीष सोंजा यांनी दिला. 6 / 10कंवलसेट प्लाझ्मा ही काही जादूची गोळी नाही. काही रुग्णांचा एक विशिष्ट्य सबसेट असू शकतो ज्याला या थेरेपीचा फायदा होऊ शकतो. मात्र अद्यापतरी यावरील संशोधन प्रगतीपथावर आहे, असे एम्सच्या मेडिसिन विभागातील प्राध्यापक डॉ. मनीष सोंजा यांनी सांगितले. 7 / 10इंडियन मेडिकल रिसर्च असोसिएशन (आयसीएमआर) सुद्धा प्लाझ्मा थेरेपीच्या उपयुक्ततेबाबत संशोधन करत आहे. मात्र त्याबाबतचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, प्लाझ्मा थेरेपी झालेल्या रुग्णांमध्ये २८ दिवसांमधील मृत्यूदरात फारसा फरक पडलेला दिसून आलेला नाही, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे. 8 / 10प्लाझ्मा थेरेपीचा मृत्यू दरावर काही परिणाम होतोय का याचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली एम्सने दोन गट कार्यान्वित केले होते. दोन्ही गटांना याच्या उपयुक्ततेबाबत वेगवेगळी माहिती मिळाली मात्र दोन्हींचा परिणाम सारखाच दिसून आला. दोन्ही अभ्यास गटांना प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फासरे अंतर दिसून आले नाही. 9 / 10शास्त्रज्ञांनी सांगितले की, आम्ही कंन्सल प्लाझ्माच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी एक छोटीशी चाचणी घेतली होती. ज्यामध्ये मृत्यूदरात फासरा परिणाम दिसून आला नाही. मात्र कोरोना रुग्णांच्या श्वसनामध्ये फरक दिसून आला. ज्या रुग्णांना कोरोना थेरेपी देण्यात आली. त्यांना श्वास घेण्यामध्ये त्रास कमी होतो. मात्र ज्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी होत नाही, अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत राहतो. 10 / 10सरळसोप्या भाषेत सांगायचं तर प्लाझ्मा थेरेपीमध्ये अँटीबॉडीचा वापर केला जातो. कुठल्याही विशेष विषाणूविरोधात शरीरामध्ये अँटीबॉडी तेव्हाच बनते जेव्हा व्यक्ती त्यामुळे पीडित असतो. सध्या कोरोनाचा फैलाव होत आहे, अशा काळात एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या शरीरात अँटीबॉडी विकसित होतात. मात्र काही जणांच्या शरीरात लगेच अँटीबॉडी बनत नाहीत. त्यामुळे अशी व्यक्ती आजारी पडते. अशा व्यक्तींवर प्लाझ्मा थेरेपीचा पर्याय समोर ठेवला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications