शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: जाणून घ्या! कोरोना व्हायरस कधीपर्यंत नष्ट होणार?; ज्योतिषांची ‘भविष्यवाणी’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 8:31 AM

1 / 13
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १९० हून अधिक देशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत जगात ५४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली तर ३ लाख ४० हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 13
भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला असून देशातील १ लाख २५ हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ हजार ५०० हून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
3 / 13
जगभरात थैमान घातलेल्या या संसर्गजन्य आजारावर अनेक वैज्ञानिक संशोधन करत आहे. अद्याप कोणालाही या रोगावर औषध शोधण्यात यश आलं नाही. या रोगावर लस येण्यासाठी किमान एक वर्ष तरी जाईल असं संशोधकांकडून सांगण्यात येत आहे.
4 / 13
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार २१ जूनपासून सुरू होणारे सूर्यग्रहण ग्रह नक्षत्रांमधील बदलांमुळे जग साथीच्या आजारापासून मुक्त होऊ शकते. हे सूर्यग्रहण मृगशिरा नक्षत्रात पडणार आहे. त्याचवेळी, ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोरोना महामारी संपुष्टात येईल असं सांगण्यात आलं आहे.
5 / 13
ज्येष्ठ ज्योतिषी आचार्य डॉ. पवन त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, ३० मार्च रोजी मकर राशीत गुरूचा संचार झाला होता, जो ३० जूनपर्यंत राहील. ३० जूनला बृहस्पति परत धनु राशीमध्ये जाईल. दरम्यान, २१ जून रोजी मृगशिरा नक्षत्रात सूर्यग्रहण होईल. या दिवशी, मंगळ देखील शनिची राशी सोडून गुरूच्या राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे या साथीचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.
6 / 13
यापूर्वी २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाचा परिणाम अशुभ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतरच भारतात या साथीचा परिणाम वाढू लागला. त्रिपाठी म्हणतात की, ११ मे पासून शनीचीही वक्रदृष्टी झाल्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भारतासाठी त्रासदायक ठरतील.
7 / 13
कोरोना महामारीबद्दल सांगताना पवन त्रिपाठी म्हणतात की, भारताच्या जन्मकुंडलीनुसार १४ एप्रिलपर्यंत वेळ जास्त वाईट होती. भारतीय नववर्षाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदाची सुरुवात २५ मार्च २०२० रोजी म्हणजेच बुधवारी झाली आहे. म्हणजेच या वर्षाचा राजा बुध आहे आणि चंद्र यांच्यासमवेत मंत्री म्हणून आहेत. या दोघांच्या परिणामी, जून 2020 पर्यंत हा आजार नष्ट होण्याची शक्यता आहे.
8 / 13
काशीचे प्रख्यात ज्योतिषी प्रा. चंद्रमौली उपाध्याय यांनी सांगितले की, १८ जून रोजी शनी वक्री होत आहे आणि उत्तरादा नक्षत्राच्या दुसर्‍या टप्प्यात राहील. यावेळी, सूर्य मिथुनमध्ये असेल आणि शनि मकर राशीत असेल. इतकेच नाही तर २७ मे रोजी गुरु देखील परत जात आहे. जेव्हा शनि मागे जाईल तेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी होईल. हा परिणाम २० जून ते ३० जून दरम्यान दिसू लागेल.
9 / 13
प्रख्यात ज्योतिषाचार्य के.एन.राव आणि त्यांच्या शिष्यांनी कोविड -१९ चक्र बनवून याची विस्तृत गणना केली आहे. ज्योतिष जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या ज्योतिषीय अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, २१ जून रोजी कर्क रेषेच्या उष्णकटिबंधीय भागावर सूर्य येईल, येथून सूक्ष्मजंतू आणि विषाणूंचे निर्मूलन करण्यासाठी वेग मिळेल.
10 / 13
१९ ऑगस्ट रोजी राहू मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि केतु ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा कोविड -१९ च्या संपण्याची चिन्हे दिसतील. ही गणना जूनच्या सुरुवातीस भारतातील परिस्थिती सर्वसामान्यतेकडे जाईल ही शक्यता निर्माण करते. फेब्रुवारी ते मे या काळात आलेल्या अडचणीच्या तुलनेत हा काळ सामान्य वाटेल असं सांगण्यात आलं आहे.
11 / 13
कोरोना हा एक विषाणूजन्य आजार आहे ज्याने साथीचा रोगाचं रूप धारण केला आहे आणि जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती प्रथम १९३० च्या दशकात आणि नंतर १९४० मध्ये प्राण्यांमध्ये दिसून आली. त्यानंतर १९६० मध्ये सर्दी झालेल्या एका व्यक्तीमध्ये एक कोरोना सापडला. त्यानंतर २०१९ मध्ये चीनमध्ये त्यांचे रौद्ररुप पाहायला मिळालं आणि जे आता हळूहळू जगभर पसरत आहे.
12 / 13
जानेवारीनंतर कोरोना वेगाने पसरू लागला. यापूर्वी २६ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण होते. हे ग्रहण नकारात्मक परिणाम देणार होते, ज्यामुळे ही महामारी उद्भवली. ज्योतिषांच्या मते, ग्रहणामुळे उद्भवणारे हे संकट ग्रहणानंतरच संपेल. २१ जून रोजी पुन्हा सूर्यग्रहण आहे.
13 / 13
सूर्यग्रहणानंतर असे योग तयार होतील, ज्यामुळे कोरोनाचे संक्रमण संपुष्टात येऊ लागेल आणि त्यानंतर सप्टेंबरपर्यंत ते पूर्णपणे नष्ट होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या