शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 8:16 AM

1 / 12
कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असतानाच एक आनंदाची बातमी येऊन धडकली आहे.
2 / 12
भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे.
3 / 12
विशेष म्हणजे या लसीला मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला सोमवारी ही परवानगी भारतीय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दिली आहे.
4 / 12
भारत बायोटेक ही हैदराबादची फार्मा कंपनी आहे, जिनं कोरोनावर लस बनविल्याचा दावा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'कोव्हॅक्सिन'च्या फेज -१ आणि फेज -२च्या मानवी चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
5 / 12
. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाचणीचे काम सुरू केले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. भारत बायोटेकला लस बनवण्याचा पूर्वीचा अनुभव आहे.
6 / 12
. यापूर्वी कंपनीने पोलिओ, रेबिज, रोटाव्हायरस, जपानी एन्सेफ्लायटिस, चिकनगुनिया आणि झिका विषाणूची लसदेखील बनविल्या आहेत.
7 / 12
कोरोना विषाणूशी संबंधित SARS-CoV-2 स्ट्रेनला पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे वेगळं करण्यात आलं आहे.
8 / 12
त्यानंतर स्ट्रेनला भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेकने विकसित केलेली पहिली स्वदेशी लस आहे.
9 / 12
हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमधील सर्वात सुरक्षित लॅबमधील बीएसएल -3 (बायोसॅफ्टी लेव्हल 3) मध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.
10 / 12
कंपनीने प्री-क्लिनिकल अभ्यास आणि रोगप्रतिकारक प्रतिसादाचा अहवाल सरकारला सादर केला आहे. यानंतर डीसीजीआय आणि आरोग्य मंत्रालयाने मनुष्यावर प्रयोगसाठी फेज -१ आणि फेज -२ ला मान्यता दिली आहे. यासह जुलैमध्ये देशात या लसीची चाचणी सुरू होणार आहे.
11 / 12
कोव्हॅक्सिन ही भारतात तयार केलेली पहिली लस आहे. आयसीएमआर आणि एनआयव्हीने ही लस तयार करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
12 / 12
तसेच मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी मिळविण्यात डीसीजीआयने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा अल्ला यांच्या म्हणण्यानुसार, संशोधन व विकास (आर अँड डी) टीमच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या