शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोना रुग्णांमध्ये आढळले ‘सुपर स्प्रेडर’ लोक; यांनीच ६० टक्के लोकांना केलं संक्रमित

By प्रविण मरगळे | Published: October 02, 2020 7:27 PM

1 / 10
भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. या धोकादायक विषाणूची लागण आतापर्यंत ६३ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे, तर मृतांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे.
2 / 10
वाढता संसर्ग लक्षात घेता, देशातील शास्त्रज्ञ वेगाने संशोधन आणि अभ्यास करीत आहेत. याच अनुक्रमे, सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की देशातील केवळ आठ टक्के कोरोना रूग्णच सुपर स्प्रेडर्स बनून ६० टक्के लोकांना संक्रमित करत आहेत.
3 / 10
सुपर स्प्रेडर म्हणजे कोणत्याही संक्रमणाला सर्वात जास्त पसरवणारे लोक. कोरोना व्हायरसमध्येही सुपर स्प्रेडर आहेत. हे असे लोक आहेत जे बर्‍याच लोकांच्या संपर्कात येतात आणि नकळत या सर्व लोकांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव करतात.
4 / 10
विज्ञान जर्नलच्या अभ्यासानुसार सुपर स्प्रेडर बद्दल मोठा खुलासा समोर आला आहे. जर्नलच्या अभ्यासात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील ५ लाख ७५ हजार लोकांचा समावेश केला होता. यातील ८४ हजार ९६५ लोक संक्रमित आढळले.
5 / 10
या लोकांच्या संपर्कात आलेल्या लाखोंचा अभ्यास करण्यात आला. संशोधनात असं आढळले आहे की, देशातील सुमारे ७० टक्के संक्रमित लोकांनी इतर व्यक्तींमध्ये संक्रमण पसरवलं नाही.
6 / 10
त्याच वेळी, संसर्ग झालेल्या ८ टक्के लोकांनी कोरोना एकूण ६० टक्के लोकांना कोरोनाच्या विळख्यात आणलं. ज्या लोकांनी स्वत:चा जीव गमावला त्यापैकी ६३ टक्के आधीच इतर कोणत्याही आजारांनी ग्रस्त होते.
7 / 10
तर ३६ टक्के लोकांमध्ये यापूर्वी दोन किंवा त्याहून अधिक गंभीर आजार होते. ४६ टक्के लोक डायबेटिज्सने ग्रस्त होते. रुग्णालयात ज्यांनी आपले प्राण गमावले ते मृत्यूच्या सरासरी पाच दिवस आधी रुग्णालयात होते. अमेरिकेत हा आकडा १३ दिवसांचा आहे.
8 / 10
या अभ्यासामध्ये सहभागी असलेल्या फॉर डिजीज डायनामिक्स, इकोनॉमिक्स अँन्ड पॉलिसी, नवी दिल्लीचे वैज्ञानिक, रामानन लक्ष्मीनारायण यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील प्रकरण विकसित देशांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. विकसित देशात संक्रमित आणि मृतांमध्ये वृद्धांची संख्या आहे. परंतु आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ४० ते ६९ वर्षे वयोगटातील लोकांना सर्वात जास्त संसर्ग झाला आहे.
9 / 10
समान वयोगटाच्या संपर्कात येण्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. शून्य ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे सर्वाधिक पाहायला मिळाले. यानंतर, ६५ वर्षांवरील लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले.
10 / 10
पाच ते १७ वयोगटातील लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ०.०५ टक्के होते. त्याचबरोबर ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ते १६.६ टक्के आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या