CoronaVirus india third covid19 wave may arrive by october says report
CoronaVirus: इशारा! देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:14 PM1 / 8कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. मेडिकल एक्सपर्ट्सच्या रॉयटर्स पोलनुसार, ऑक्टोबरपर्यंत भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या पोलनुसार लोकांनी आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता आहे. (CoronaVirus india third covid19 wave may arrive by october says report)2 / 8या पोलमध्ये जगातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक, व्हायरलॉजिस्ट, महामारी तज्ज्ञ आणि प्रोफेसर्सना सामील करण्यात आले होते. यांच्याकडून 3 ते 17 जूनदरम्यान प्रतिक्रिया घेण्यात आल्या.3 / 8सर्व्हेनुसार, कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येईल, असे 85 टक्क्यांपेक्षा अधिक जणांनी म्हणजेच 24 पैकी 21 जणांनी म्हटले आहे. यांपैकी तिघांनी ऑगस्टच्या सुरुवातीला आणि 12 जणांनी सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असे म्हटले आहे. तर इतर तिघांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येऊ शकते असे म्हटले आहे.4 / 870 टक्क्यांपैक्षा अधिक तज्ज्ञांनी म्हणजेच 34 पैकी 24 जणांनी म्हटले आहे, की दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल. 5 / 8दुसरी लाट अधिक जीवघेणी ठरली आहे. यादरम्यान आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक काळ चालली. 6 / 8अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना म्हटले आहे, की नव्या लाटेवर अधिक नियंत्रण असेल. कारण ही लाट येईपर्यंत देशात मोठ्या प्रमाणाव लसीकरण झालेले असेल. 7 / 8याशिवाय, तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेमुळेही काही प्रमाणावर नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळेल, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.8 / 8मात्र, मुले आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रभावासंदर्भात तज्ज्ञांची मतं वेगवेगळी दिसत आहेत. 40 पैकी 26 तज्ज्ञांनी म्हटले आहे, की मुलांना सर्वाधिक धोका असेल. तर उरलेल्या 14 जणांनी, असे होणार नाही, असे म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications