Coronavirus india updates 14378 cases 480 deaths 1992 recovered SSS
Coronavirus : दिलासादायक! देशात 1992 जणांनी केली कोरोनावर मात By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 3:17 PM1 / 12कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 2 / 12भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 3 / 12जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे.4 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 480 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.5 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. याच दरम्यान कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.6 / 12देशात 1992 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या रुग्णालयांत 11,906 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.7 / 12कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 8 / 12भारतात आतापर्यंत 1900 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 / 12जगात 571,577 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 10 / 12वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,250,432 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे11 / 12जगात 571,577 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 37,158 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 12 / 12अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications