Coronavirus industrial activity to resume only in orange green zones SSS
Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 12:47 PM1 / 18कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.2 / 18देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 15,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 18पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळून काळजी घेण्यास सांगितलं आहे. 4 / 18कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. 5 / 18आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील. 6 / 18राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल.7 / 18दिल्ली राज्य सरकारने मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला आहे. देशभरात आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू असणार हे जाणून घेऊया.8 / 18शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे9 / 18मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प10 / 18बँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.11 / 18जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.12 / 18मनरेगा - सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.13 / 18ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी14 / 18पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री15 / 18पोस्टल, कुरिअर सेवा, दुरध्वनी, इंटरनेट सेवा16 / 18ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा17 / 1850 टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा18 / 18कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स आणखी वाचा Subscribe to Notifications