1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. 2 / 14भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. 3 / 14देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,77,29,247 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,73,790 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,617 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,22,512 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 4 / 14कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 5 / 14कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असताना मृतांचा आकडा वाढत असल्यामागचं नेमकं कारण आता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार, 9 मे नंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. 6 / 14कोरोना मृतांच्या आकड्यामध्ये मात्र कोणताच फरक पाहायला मिळत नाही. कोरोनामुळे जवळपास चार हजारहून अधिक लोकांना दररोज आपला जीव गमवाव लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 7 / 14पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांच लहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्येत कमी पाहायला मिळत असली तरी मृतांच्या आकड्यावर याचा परिणाम हा 14 दिवसांनंतर पाहायला मिळेल. 8 / 14संसर्गाचे हे एक चक्र आहे. दुसऱ्या देशामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील काही दिवसांनी कोरोना मृतांच्या संख्येत घट झाली आहे. 9 मे पासून भारतात कोरोनाचा ग्राफ खाली येत असलेला पाहायला मिळत असल्याचं लहारिया यांनी म्हटलं आहे. 9 / 14कोरोना मृतांची आकडेवारीची आता खरी माहिती समोर येत असल्याने संख्या वाढत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14कोरोनाच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण जर्नल इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाले आहे. कोरोना काळात रुग्णांवर अँटिबायोटिक्सचा बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुपरबग तयार होतो. परिणामी, बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन वेगाने वाढते, अशी माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.11 / 14सूक्ष्मजीवांना (बॅक्टेरिया) निष्प्रभ करण्यासाठी अँटीबायोटिक्स वापरली जातात; मात्र अँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे अँटीबायोटिक्स औषधांचा परिणाम होत नाही, अशी माहिती जर्नल इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसने समोर आणली आहे.12 / 14कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; 70 टक्के प्रभावी असल्याचा दावा कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शन आढळून आले होते. हे इंफेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते. 13 / 14संशोधन अहवालातील माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये अँटिबायोटिक्समुळे अतिरिक्त संक्रमण झाले. देशातील 60 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. त्यामुळे 60 टक्के मृत्यूंना केवळ बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभूत ठरला. 14 / 14सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ 11 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराला तोंड देत होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.