CoronaVirus Live Updates : सणासुदीच्या काळात निष्काळजीपणा ठरेल घातक, कोरोनाचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:32 IST
1 / 15देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,382 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 318 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,46,368 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 15देशात कोरोनाचा वेग मंदावत असून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र असं असताना काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. 3 / 15सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. 4 / 15देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.5 / 15केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.6 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.7 / 15कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.8 / 15देशाचा रिकव्हरी रेट हा 97.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर काही राज्यांमध्ये वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 62 कोटी लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 21 कोटी लोकांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 15तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.10 / 15घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. 11 / 15जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनावर अनेकांना यशस्वीरित्या मात केली असून अनेक जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांनी कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.12 / 15देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नसल्याचं म्हटलं आहे. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणं गरजेचं असल्याचं देखील सांगितलं.13 / 15रणदीप गुलेरिया यांनी सर्व लोकांना सण-समारंभाच्या काळात गर्दीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट होत आहे. कोरोना देशातून पूर्णत: कधीच नष्ट होणार नाही. मात्र देशात वेगाने होणाऱ्या लसीकरणामुळे कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे.14 / 15कोरोना व्हायरस हा लवकरच साधा ताप, सर्दी, खोकलासारखा होणार आहे. कारण लोकांमध्ये आता कोरोना विरोधात इम्युनिटी तयार झाली आहे. पण आजारी आणि इम्युनिटी कमी असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा असणारच आहे असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.15 / 15देशातील सर्व लोकांना कोरोना लस देणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल. सर्वात आधी सर्वांनी लस घेतली पाहिजे त्यानंतर बूस्टर डोसचा विषय येईल. डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचं लक्ष्य असल्याचं डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलं आहे.