शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोना संक्रमणाचा धोका वाढला; 99 टक्के नमुन्यांमध्ये Delta Variant आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:25 PM

1 / 16
देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे. सणसमारंभाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेला गंभीर इशारा आता खरा ठरताना दिसत आहे. कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
2 / 16
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3,42,73,300 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 446 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,58,186 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 16
दिल्ली सरकारने ऑक्टोबर महिन्यात तपासलेल्या कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या नमुन्यांपैकी 99 टक्के रुग्णांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) आढळून आला आहे. यावरून Sars-CoV-2 व्हायरसचा देखील शोध लागला आहे.
4 / 16
या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ची स्थापना झाल्यापासून, दिल्लीतून 7,300 हून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये घेतलेल्या 54% आणि मे महिन्यात 82% नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला.
5 / 16
जेव्हा दिल्लीत कोरोनाचा कहर होता आणि एका दिवसात 28 हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात होती. यावेळी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. समोर आलेल्या डेटानुसार, त्यावेळी घेतलेल्या एकूण नमुन्यांपैकी 39 टक्के हा डेल्टा व्हेरिएंटचा होता.
6 / 16
Sars-Cov-2 च्या डेल्टा व्हेरिएंटने इतक्या वेगानं लोकं संक्रमित केले की, काही आठवड्यातच त्याने अल्फा व्हेरिएंला देखील मागे टाकलं आणि दिल्लीत आता कोरोनाची सर्वात विनाशकारी लाट निर्माण झाली आहे.
7 / 16
कोरोना विषाणूचे निरीक्षण करणार्‍या संशोधकांच्या मते, देशातील सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार अजूनही डेल्टा (B1.617.2) आहे जो जवळपास निम्म्या नमुन्यांमध्ये आढळतो, त्यानंतर AY.4 डेल्टा स्ट्रेन येतो.
8 / 16
कोरोनाच्या डेल्टा प्लस- AY.4.2 या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटन आणि युरोपमधील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. भारतात हा प्रकार आढळून आल्यावर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे सल्लागार डॉ. सुनिला गर्ग यांनी महत्त्वाची माहिती दिली.
9 / 16
भारतात या प्रकाराची उपस्थिती 4 महिन्यांपासून आहे, मात्र काळजी करण्यासारखे काही नाही असं गर्ग यांनी म्हटलं आहे. दुर्गापूजेमुळे केसेस वाढल्या आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएंटची चौकशी केली जात आहे. हा व्हेरिएंट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही आढळून आला आहे.
10 / 16
कोरोना व्हायरस AY.4.2 चे नवा म्यूटेंट भारतात सापडले असले तरी त्याची संख्या खूपच कमी आहे. व्हायरसचे हे स्वरूप डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं मानलं जात आहे, कारण ते त्याच्यापेक्षा वेगाने पसरते.
11 / 16
INSACOG नेटवर्क मॉनिटरिंग व्हेरिएशन्सच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी ही माहिती दिली. असं मानलं जातं की, AY.4.2 मुळे ब्रिटन, रशिया आणि इस्रायलमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 16
कोरोना लस घेतलेल्या लोकांकडून वेगाने डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार होत असल्याची आता माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा लसीकरण केलेल्या लोकांपासून त्यांच्या संपर्कांमध्ये असलेल्या लोकांमध्ये सहजपणे वेगाने पसरू शकतो असं म्हटलं आहे.
13 / 16
लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांनी देखील लस घेतली असेल तर कोरोना डेल्टा संक्रमणाचा धोका कमी असणार आहे. इंपीरियल कॉलेज लंडनने केलेल्या संशोधनातून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
14 / 16
संशोधकांनी कोरोनाचा गंभीर धोका कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे लस आहे. तसेच बुस्टर डोस घेण्याची देखील गरज आहे असं म्हटलं आहे. ज्या लोकांनी लस घेतली आहे ते लोक लवकर बरे झाले आहे.
15 / 16
लस घेतलेल्या लोकांना कोरोनाचा धोका असून ते आपल्या घरामध्ये कोरोनाचा प्रसार करू शकतात, असं देखील म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच जगभरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. लसीकरण जास्त असलेल्या देशात असं होत आहे.
16 / 16
लस घेतलेल्या लोकांमध्ये इतर आजारामुंळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी होतं. Kaiser Permanente यांनी केलेला हा रिसर्च अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मृत्यू दर साप्ताहिक अहवालात करण्यात आली आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली