CoronaVirus Live Updates corona in jodhpur city every 2 minutes one person covid positive
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे रौद्ररुप! 'या' शहरात दर 2 मिनिटाला एक व्यक्ती येतेय पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:12 PM1 / 17देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाख 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे. 2 / 17कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. 3 / 17कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानाच्या जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे.4 / 17वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.5 / 17जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे. 6 / 17राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एकूण 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वसतिगृहात कोरोना विस्फोट झाल्यानंतर वसतिगृह परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केलं आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्येच आयसोलेट करण्यात आलं आहे.7 / 17सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस जरी कोरोना संसर्ग झाला असेल आणि तो वेळेत आयसोलेट झाला नाही झाला, तर तो संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. 8 / 17दररोज हजारो लोकांना संक्रमण होण्यामागे हेच मुख्य कारण आहे. जोधपूर शहरात कोरोना लसीचा साठा संपल्याची घटना ताजी असताना शहरात आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. 9 / 17कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. असं असताना अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही सरकारी रुग्णालयांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 17गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1,38,73,825 वर पोहोचली आहे. 11 / 17कोरोनामुळे देशात 1,72,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.12 / 17कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हरिद्वारमध्ये फक्त दोन दिवसांत एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 13 / 17मंगळवारी 594 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सोमवारी हरिद्वारमध्ये 408 रुग्ण आढळले होते. कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2812 वर पोहोचली आहे. महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. 14 / 17आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका रिसर्चमध्ये हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. व्यायाम आणि शारीरीक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. 15 / 17ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे. 16 / 17कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे17 / 17डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications