CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! मे महिन्यात देशात दररोज होऊ शकतात 5000 मृत्यू; रिसर्चमधून तज्ज्ञांचा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:24 AM
1 / 15 कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. 2 / 15 जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 14 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर आता कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. 3 / 15 गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. 4 / 15 गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. 5 / 15 कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. 6 / 15 कोरोनामुळे काही ठिकाणी भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, 7 / 15 देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत असताना संशोधनातून ही माहिती आता समोर आली आहे. 8 / 15 वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल असं म्हटलं आहे. 9 / 15 तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. 10 / 15 10 मे रोजी भारतात 5 हजार 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत देशात 3 लाख 29 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे. 11 / 15 देशात कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्येने अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15 कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 13 / 15 बिहारमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढतोय. याच दरम्यान पाटणा येथील एम्समध्ये (AIIMS )कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 14 / 15 एम्समधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 / 15 केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे. आणखी वाचा