CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! अमेरिका-ब्रिटनमध्ये चिमुकल्यांमधील कोरोना संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 5:51 PM
1 / 14 कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 2 / 14 भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे. 3 / 14 लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतील अल्बामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्लोरिडामध्ये 18 वर्षाखालील मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. 4 / 14 अरकंसासमधील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सात नवजात बालके अतिदक्षता विभागात असून दोन व्हेंटिलेटवर असल्याची माहिती मिळत आहे. 5 / 14 लुसियानामध्ये जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वाधिक 4232 मुलांना बाधा झाल्याचे समोर आले. या ठिकाणी 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान पाच वर्षाखालील 66 मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. 6 / 14 फ्लोरिडातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षाखालील 10 हजार 785 मुलांना कोरोनाची लागण झाली. तर 23 जुलै ते 30 जुलै दरम्यान 224 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 7 / 14 युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलचे बाल रोग तज्ज्ञ प्रा. एडम फिन्न यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा आजार पहिल्या दोन लाटेच्या तुलनेने वेगळा असल्याचं म्हटलं आहे. 8 / 14 इम्पिरिअल कॉलेज लंडनमधील पीडियाट्रिक इन्फेक्सियश आजार तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ व्हिक्टर यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 12 वर्षावरील मुलांमध्ये संसर्गाचा दर वाढला आहे. त्यातील बहुतांशी मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे मुलांच्या लसीकरणावर लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. 9 / 14 तज्ज्ञांनी लठ्ठ आणि मधुमेहानेग्रस्त असलेल्या मुलांसाठी हा काळ आव्हानात्मक आहे असं म्हटलं आहे. संसर्गाचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. अमेरिकेतील मुलांमध्ये पीडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टी सिस्टम सिंड्रोमची (पीआयएनएस) प्रकरणे वाढली आहेत. 10 / 14 मुलांवर वेळेवर उपचार न झाल्यास त्यांचा जीव धोक्यात येऊ शकते असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 11 / 14 अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 40 लाखांहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. 12 / 14 अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या रिपोर्टनुसार, 15 जुलैपर्यंत सुमारे 40.09 लाख मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 13 / 14 गेल्या आठवड्यात 23,500 हून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत लहान मुलांची कोरोना बाधित होण्याची संख्या 14.2 टक्के एवढी आहे. रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांमध्ये 1.3 ते 3.6 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत. 14 / 14 अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या लहान मुलांचा मृत्युदर 0 ते 0.26 टक्के एवढा आहे. कोरोना व्हायरसमुळे लाखो लहान मुलं अनाथ झाले आहेत. एका वृत्तानुसार, आत्तापर्यंत जगातील 21 देशांमध्ये 15.62 लाख मुलांनी आपले आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले आहेत. यापैकी 1,16,263 मुले ही भारतातील आहेत. आणखी वाचा