CoronaVirus Live Updates corona virus attack on women the most in second wave
CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! दुसऱ्या लाटेत कोरोनाने महिलांवर केला सर्वाधिक अटॅक; वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 3:15 PM1 / 16देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 3,16,95,958 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40,134 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 16कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,24,773 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट महिलांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. दुसऱ्या लाटेत पुरुषांपेक्षा जास्त महिलांना संसर्ग झाल्याची माहिती आता समोर आली आहे.3 / 16गेल्या वर्षी पहिल्या लाटेत वृद्ध सर्वाधिक बळी पडले होते. मात्र यावर्षी दुसऱ्या लाटेत महिला आणि तरुणांनाही अधिक संसर्ग होत आहे. आरोग्य विभागाच्या मते, दुसऱ्या लाटेत एकूण संक्रमित रुग्णांमध्ये 52.5 टक्के महिला आहेत. 4 / 16जानेवारी ते जुलै पर्यंत 52.5 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी 58.8 टक्के पुरुष आहेत. म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकूण संक्रमित रुग्णांपैकी 58 टक्के पुरुष तर 52 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे. 5 / 16आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत पंजाबच्या भटिंडामध्ये सुमारे 32 हजार 852 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यात 20 हजार 850 पुरुषांचा समावेश आहे, तर 12 हजार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.6 / 1624 टक्क्यांपर्यंत संसर्गामुळे त्याचा परिणाम झाला आहे. यानंतर, 50 ते 65 वयोगटातील लोकांना सर्वाधिक संसर्ग झाला आणि त्यांची टक्केवारी 18 आहे. त्याच वेळी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय 50 ते 80 दरम्यान होते.7 / 16जिल्ह्यातील संक्रमणाचे प्रमाण काही काळाने कमी होत आहे आणि ही एक दिलासा देणारी बाब आहे. परंतु जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेदरम्यान, जास्तीत जास्त संसर्ग 30 ते 45 वयोगटात झाला आहे. 8 / 1624 टक्क्यांपर्यंत संसर्गामुळे त्याचा परिणाम झाला आहे. यानंतर, 50 ते 65 वयोगटातील लोकांना सर्वाधिक संसर्ग झाला आणि त्यांची टक्केवारी 18 आहे. त्याच वेळी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय 50 ते 80 दरम्यान होते.9 / 16डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्रियांमध्ये संसर्ग वाढण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे व्हायरसचं म्युटेशन हे आहे. त्याच्या स्वरुपात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे महिलांव्यतिरिक्त तरुण देखील मोठ्या प्रमाणात व्हायरसला बळी पडत आहेत. 10 / 16महिलांमध्ये ऑक्सिजनचा अभाव हे देखील कोरोना संसर्गाचे मुख्य कारण होते. गर्भवती महिलांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. प्रसूतीपूर्वी किंवा नंतर ऑक्सिजनचा अभाव. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तिसरी लाट नक्कीच येईल, त्यामुळे तिसऱ्या कोरोना लाटेतही मुले आणि महिलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.11 / 16आरोग्य विभागाच्या मते, दुसऱ्या लाटेदरम्यान 0 ते नऊ वर्षे वयाच्या मुलांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. एकूण संक्रमितपैकी, या वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग 1.6 टक्के होता. ते म्हणाले की, पहिल्या लाटेदरम्यान, या वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग खूप कमी होता.12 / 16दुसऱ्या लाटेत 10 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांचा संसर्ग पाच ते सात टक्के होता. दुसऱ्या लाटेत शून्य ते नऊ वर्षांच्या मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 16कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे.14 / 16गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे.15 / 16ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.16 / 16रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications