CoronaVirus Live Updates corona virus can also spread in the air confirms the study
CoronaVirus Live Updates : धोका वाढला! हवेतूनही पसरू शकतो कोरोना व्हायरस अन्...; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:33 PM1 / 12देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,205 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात तब्बल 523920 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 2 / 12गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाचा प्रभाव, त्याचा प्रसार आणि त्याची मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोरोनाशी संबंधित रोज नवीननवीन माहिती आता समोर येत आहे. 3 / 12आधी असं मानले जात होतं की कोरोना पृष्ठभागावर पसरतो. तज्ज्ञांनी ज्या देशांमध्ये लोक मास्क घालण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात त्या देशांमध्ये त्याचा प्रसार कमी होतो असं म्हटलं आहे. 4 / 12कोरोना व्हायरसचे कण हवेतून पसरत असल्याबाबत फारसे पुरावे मिळाले नाहीत. पण आता एका अभ्यासात त्याचा प्रसार हवेतून झाल्याची पुष्टी झाली आहे. सीएसआयआर-सीसीएमबी, हैदराबाद आणि सीएसआयआर-आयएमटेक चंदीगडच्या शास्त्रज्ञांच्या गटाने संयुक्तपणे एक रिसर्च केला आहे. 5 / 12हा रिसर्च हैदराबाद आणि मोहाली येथील रुग्णालयांमध्ये करण्यात आला. जेथे SARS-CoV 2 चा हवेत प्रसार होत असल्याची पुष्टी झाली आहे. हे संशोधन जर्नल ऑफ एयरोसोल सायन्समध्ये प्रकाशित झाले आहे. 6 / 12शास्त्रज्ञांनी अशा ठिकाणच्या हवेचे नमुने घेऊन कोरोनाच्या जीनोमचे विश्लेषण केले, जिथे कोविड-19 च्या रुग्णांनी काही काळ घालवला होता. उदाहरणार्थ, रूग्णालये, बंद खोल्या जेथे रूग्ण काही काळ थांबला किंवा रूग्ण राहत असलेलं घर.7 / 12रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की कोविडचे रुग्ण जेथे उपस्थित होते त्या आसपासच्या हवेत व्हायरस आढळू शकतात, इतकेच नाही तर ज्या ठिकाणी रुग्ण उपस्थित होते तेथे पॉझिटिव्हिटी रेटही जास्त होता. 8 / 12हा व्हायरस रुग्णालयाच्या आयसीयू आणि नॉन-आयसीयू वॉर्डमध्ये असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे, ज्यामुळे रुग्णाने हा व्हायरस हवेत सोडला होता. रिसर्चमध्ये असे आढळून आले की हवेत एक जिवंत व्हायरस आहे जो कोणत्याही जिवंत पेशीला संक्रमित करू शकतो आणि लांब अंतरावर पसरू शकतो.9 / 12शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या रिसर्चशी निगडित शास्त्रज्ञ शिवरंजनी मोहिरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे परिणाम असे दर्शवतात की कोरोना व्हायरस काही काळ बंद ठिकाणी राहू शकतो. 10 / 12अशा ठिकाणी दोन किंवा अधिक कोरोना रुग्ण एकत्र असल्यास हवेतील संसर्गाचे प्रमाण 75 टक्के असू शकते. दुसरीकडे एक रुग्ण किंवा कोणताही रुग्ण उपस्थित नसल्यास, संसर्ग दर 15.8 टक्के राहतो.11 / 12मोहरीर म्हणतात की त्यांची निरीक्षणे पूर्वीच्या अभ्यासाला देखील समर्थन देतात की SARS-CoV-2 RNA चे प्रमाण बाहेरच्या तुलनेत बंद खोल्यांमध्ये जास्त होते. त्यामुळे रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये जेथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येतात, तेथे विषाणूचे प्रमाण जास्त असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications