शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गंगेच्या पाण्याने होणार कोरोनावर उपचार?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:53 PM

1 / 15
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 15
भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,353 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
3 / 15
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. काही राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे.
4 / 15
गंगा नदीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीचं पाणी सर्वात पवित्र (Ganga River) असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आता तज्ज्ञही कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत.
5 / 15
बीआरडी मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजिस्ट अमरेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लखनऊमधील नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यात कोरोना व्हायरस आढळून आला होता.
6 / 15
विविध ठिकाणच्या नद्यांमधील पाण्याची त्यानंतर तपासणी सुरू करण्यात आली होती. एम्स हृषिकेशने गंगा नदीच्या पाण्याची तपासणी केली असता, त्यात कोरोनाचा व्हायरस टिकत नसल्याचं आढळून आलं.
7 / 15
हृषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कुठेही पाण्यात कोरोना व्हायरस आढळून आला नाही. रिसर्चमधीन ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
8 / 15
डॉ. अमरेश सिंह यांनी गंगाजलामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचा एक बॅक्टेरिया आढळतो. हा व्हायरस इतर व्हायरसना पाण्यात टिकू नाही. बॅक्टेरियोफेज हा हानीकारक (bacteriophage नसतो. उलट तो इतर हानीकारक व्हायरसचा खात्मा करतो असं म्हटलं आहे.
9 / 15
बंगळुरूच्या आयआयएममधील एक निवृत्त प्राध्यापक एका एनजीओसोबत मिळून गंगाजलापासून कोरोनावरील औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत संशोधन सुरू असून, या संशोधन समितीमध्ये डॉ. अमरेशही आहेत.
10 / 15
प्रामुख्याने बॅक्टेरियोफेजवर संशोधन करत आहेत. तसेच कोरोनाच्या काही रुग्णांवर याची चाचणीही करण्यात येत आहे. या चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे अमरेश यांनी स्पष्ट केलं आहे.
11 / 15
हा प्रयोग यशस्वी झाल्यास, गंगाजलाच्या मदतीने कोट्यवधी लोकांचा उपचार करणं शक्य होणार आहे. तसेच हिंदू संस्कृतीत गंगाजलाने असाध्य रोगही बरे होतात असं म्हटलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 15
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत.
13 / 15
या व्हेरिएंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालेलं नाही. पण हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
14 / 15
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.
15 / 15
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा व्हायरस लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनdoctorडॉक्टरIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस