शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : देशात जानेवारीच्या 'या' तारखेला कोरोना टोक गाठणार; 7 लाख नवे रुग्ण सापडणार?; रिसर्चमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:40 PM

1 / 16
देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असल्याने तिसरी लाट ओसरत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अशातच तज्ज्ञांनी जानेवारीच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असं म्हटलं आहे.
2 / 16
नव्या रिसर्चनुसार, भारतात 23 जानेवारीला कोरोनाची प्रकरणं शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. याकाळात देशात दिवसाला 7 लाखांहून अधिक रुग्ण नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 / 16
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (18 जानेवारी) देशात 24 तासांत कोरोनाचे 2,38,018 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 310 लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 / 16
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 17,36,628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
5 / 16
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 8,891 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
6 / 16
आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनिक दर 19.65 टक्के आणि साप्ताहिक दर 14.41 टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 3,52,37,461 लोक कोरोनामुक्त झाले आहेत आणि कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे.
7 / 16
कोरोनातून बरं होणाऱ्यांचा दर 94.27 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. यानंतर पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.
8 / 16
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल यांनी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भारतातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपेल. आयआयटी कानपूरच्या सूत्र मॉडलनुसार, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लाट उच्चांक गाठेल असं म्हटलं आहे.
9 / 16
एक्सपर्ट आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणीन्द्र अग्रवाल यांनी देशातील मेट्रो सिटीबाबत सूत्र मॉडलचा केलेला अभ्यास बरोबर नाही. कोरोना टेस्टबाबत आलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे टेस्टची संख्या कमी झाली आहे, यामुळे रुग्णसंख्या कमी येत आहे असं म्हटलं आहे.
10 / 16
उदाहरण म्हणून पाहायचं झाल्यास दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट 15 ते 16 जानेवारीला उच्चांकावर असेल, असे सांगण्यात येत होतं. गणितीय मॉडलनुसार, या काळात दररोज 45 हजार नवे रुग्ण समोर येणार होते. मात्र, या काळात प्रत्यक्षात हा आकडा 28 हजाराच्या जवळपास राहिला.
11 / 16
मुंबईतही 12 जानेवारीला कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असं सांगण्यात येत होतं. कोरोना प्रकरणांबद्दलचा हा अंदाज 72 टक्क्यांपर्यंत बरोबर आल्याचं चित्र आहे.13 जानेवारी रोजी कोलकातामध्ये संसर्गाचा उच्चांक नोंदवला गेला आणि हा अंदाज देखील 70 टक्क्यांपर्यंत खरा ठरला.
12 / 16
बंगळुरूमध्ये कोविड-19 संसर्गाचा उच्चांक 22 जानेवारीला येणार आहे. त्या काळात राज्यात दररोज 30 हजार रुग्णांची नोंद होईल, असा अंदाज आहे. सोमवारी भारतात कोरोना लसींचे 68 लाखांहून अधिक डोस देण्यात आले.
13 / 16
देशात आतापर्यंत 157.91 कोटीहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मंडी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) च्या संशोधकांना हिमालयातील 'बुरांश' (Himalay Plant Buransh) या वनस्पतीच्या पानांमध्ये 'फायटोकेमिकल' आढळून आले आहे.
15 / 16
जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. फायटोकेमिकल्स ही वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
16 / 16
हिमालयीन वनस्पती बुरांश किंवा हिमालयीन प्रदेशात आढळणाऱ्या 'रोडोडेंड्रॉन अरबोरियम' या वनस्पतीच्या रासायन युक्त पानांमध्ये व्हायरसविरोधी किंवा व्हायरसशी लढण्याची क्षमता आहे, असे संशोधनात असे दिसून आले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन