CoronaVirus Live Updates covid 19 death waits 20 hours long for cremation in national capital delhi
CoronaVirus Live Updates : भयावह! मृतदेहांचे ढिग, स्मशानभूमीत जागाच नाही; अंत्यसंस्कारासाठी पाहावी लागतेय तब्बल 20 तास वाट By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 7:09 PM1 / 14कोरोनामुळे देशात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,79,97,267 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,01,187 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3293 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. 3 / 14मृतदेहांचे ढिग पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीत जागाच शिल्लक नाही. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना रांगेत तब्बल 20 तास वाट पाहावी लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे. 4 / 14अंत्यसंस्कारासाठी मृताच्या कुटुंबीयांना 20-20 तासांची वाट पाहावी लागत आहे, यावरून भयंकर परिस्थितीची कल्पना येते. मंगळवारी एका स्मशानभूमीत जवळपास 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 5 / 14अनेक मृतदेह आणि त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्काराची वाट पाहत वाहनात बाहेरच थांबवण्यात आले आहेत. रांगेत उभे राहिलेले कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी आपली वेळ केव्हा येईल याची अनेक तासांपासून वाट पाहत आहेत. 6 / 14अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात दिल्लीत 3,601 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 2,267 जणांचा मृत्यू फक्त मागच्या आठवड्यात झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात मृत्यूचा आकडा 57 तर मार्च महिन्यात 117 वर होता.7 / 14दिल्लीमध्ये स्मशानभूमीतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता स्मशानभूमीत लाकडाची कमतरता भासू लागल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.8 / 14कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच लाकडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन विभागाकडे यासाठी मदत मागण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाकडांची व्यवस्था करण्यासाठी पालिकेच्या एजन्सींनी राज्य वन विभागाकडे संपर्क साधला आहे. 9 / 14लाकडांची समस्या दूर करण्यासाठी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुकलेल्या गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.10 / 14कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी असलेल्या निगमबोध स्मशानभूमीत दररोज 6,000-8,000 किलो लाकडांची आवश्यकता भासत होती. परंतु, दुसऱ्या लाटेदरम्यान ही मागणी प्रत्येक दिवसाला जवळपास 80,000-90,000 किलो लाकडांपर्यंत पोहचली आहे.11 / 14उत्तर एमसीडीचे महापौर जय प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमी घाटातील लाकडी साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला पार्किंग आणि पार्कमध्ये स्मशानभूमीची सुविधा करावी लागेल. 12 / 14लाकडाची गरजही बरीच वाढली आहे, म्हणून दिवसभर लाकडाची मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्ली सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शहराच्या वनविभागाने सांगितले की त्या इमारती लाकडांसाठी पालिका यंत्रणांकडून विनंत्या आल्या आहेत. 13 / 14उपवनसंरक्षक आदित्य मदनपोत्रा यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी क्षेत्र परिवहन कॉर्पोरेशनला दिल्लीत प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली तयार करण्यास परवानगी दिली आहे, जेणेकरून आता कमीतकमी 500 झाडांच्या लाकडाचा वापर होऊ शकेल. 14 / 14एसडीएमसीने दिल्ली सरकारला शेजारील राज्यांकडून लाकडाचा पुरवठा शहरात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता करता येईल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications