शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 5:38 PM

1 / 17
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे, अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून तेथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 13 कोटींवर पोहोचली आहे.
2 / 17
कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे भयावह स्थिती पाहायला मिळत आहे.
3 / 17
देशातही कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,30,60,542 वर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,67,642 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
4 / 17
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,31,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 780 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.
5 / 17
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
6 / 17
सर गंगाराम रुग्णालयानंतर आता दिल्लीतील एम्स रुग्णालयातही (Delhi AIIMS) कोरोना थैमान घातले आहे. या रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची घटना समोर आली आहे.
7 / 17
कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांमध्ये ज्युनिअर, सीनिअर अशा सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे. काही डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
8 / 17
याआधी सर गंगाराम रुग्णालयात 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतरांना होम आयोसेलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. या डॉक्टरांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 17
लखनऊमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत सहा हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह आले आहेत.
10 / 17
लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटी (KGMU) चे कुलपती डॉ विपिन पुरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केजीएमयूचे डॉ. हिमांशु यांच्यासह 40 डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
11 / 17
कुलपतींसह सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला होता. यामध्ये सर्जरी विभागाच्या 20 डॉक्टरांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
12 / 17
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्राने उच्चस्तरीय 50 वैद्यकीय टीम तयार केल्या आहेत.
13 / 17
कोरोनाचां संसर्ग वेगाने होत असलेल्या भागांमध्ये या टीम पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने 50 टीम तयार केल्या आहेत. या अतिशय उच्च स्तरीय टीम आहेत.
14 / 17
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टीम राज्यांना सहकार्य आणि मदत करतील. यामध्ये 30 टीम महाराष्ट्र, 11 टीम छत्तीसगड आणि 9 टीम या पंजाबमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत.
15 / 17
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. कोरोना लसीकरणावर करोडो रुपये खर्च केले जात असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
16 / 17
शामली येथील एका आरोग्य केंद्रावर तीन वृद्ध महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या वृद्ध महिलांना अ‍ॅन्टी रेबीज लस (Anti Rabies Vaccine) दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
17 / 17
एका महिलेची प्रकृती बिघडली असून त्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. वृद्ध महिलांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर गोंधळ घातला. तसेच कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टर