CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:04 AM
1 / 15 जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 13 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2 / 15 कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. 3 / 15 गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,38,73,825 वर पोहोचली आहे. 4 / 15 कोरोनामुळे देशात 1,72,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. 5 / 15 बुधवारी (14 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाख 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे. 6 / 15 भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 13,65,704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,23,36,036 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 7 / 15 कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. 8 / 15 कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. 9 / 15 कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत. 10 / 15 सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं. 11 / 15 देशात कोरोनाची दुसरी लाट असताना डबल मास्क वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मॅक्सच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे डॉ. रोमेल टिकू यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 12 / 15 एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क वापरता येईल. एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे. असा सल्ला डॉ. रोमेल टिकू यांनी दिला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी, सुरक्षित अंतर राखणे कठीण असताना, दुहेरी मास्क वापरणे योग्य आहे. 13 / 15 अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरित्या बसत नाहीत, काही सैल असतात. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी असते असं देखील ते म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15 दोन मास्क वापरण्याचा सल्ला देण्यामागे या मास्कमुळे फिल्ट्रेशन आधिक चांगलं होतं. विमान, रेल्वे अथवा सार्वजनिक जागी म्हणजेच ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी दोन मास्कचा वापर करता येऊ शकतो. 15 / 15 दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता. आणखी वाचा