शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : अलर्ट! देशातील 'या' राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका; 40 दिवसांत आढळले सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:37 PM

1 / 15
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,007 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
2 / 15
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीत 24 तासांत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, त्यानंतर दिल्लीतील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
3 / 15
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 299 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 40 दिवसांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी 4 मार्च रोजी दिल्लीत 304 नवीन रुग्ण आढळले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 15
दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, दिल्लीत कोरोना व्हायरसचा संसर्ग दर 2.49 टक्के नोंदवला गेला आहे. यासह, दिल्लीतील कोविड-19 संसर्गाचा दर एका आठवड्यात 0.5 टक्क्यांवरून 2.70 टक्क्यांवर पोहोचला आहे.
5 / 15
तज्ञांनी 'दैनंदिन संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे' असं म्हटलं आहे. गेल्या 2 दिवसांच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत 2 दिवसांत 501 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 800 च्या पुढे गेली आहे.
6 / 15
बुधवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, कोरोनाचे 299 नवीन रुग्ण आढळले, जे सोमवारी नोंदवलेल्या 137 प्रकरणांपेक्षा खूपच जास्त आहे. सोमवारी, संसर्ग दर 2.70 टक्के होता, जो दोन महिन्यांतील सर्वाधिक होता.
7 / 15
5 फेब्रुवारीला संसर्ग दर 2.87 टक्के होता. आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 173 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही 801 आहे.
8 / 15
दिल्लीत मंगळवारी कोरोनाच्या तपासणीसाठी 12,022 चाचणी नमुने घेण्यात आले, ज्यामध्ये 2.49 टक्के रुग्ण संक्रमित आढळले. बुधवारी दिल्लीत संसर्गाची संख्या 18,66,380 झाली आहे, तर मृतांची संख्या 26,158 आहे.
9 / 15
दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना सातत्याने हात-पाय पसरत आहे. इतकेच नाही तर अनेक शाळांमध्ये मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
10 / 15
रिपोर्टनुसार गाझियाबाद, नोएडा आणि दिल्लीतील अनेक शाळांमध्ये कोरोनाने हात-पाय पसरले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या शाळांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून एनसीआरच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 72 तासांत कोरोनाचे 35 रुग्ण आढळले आहेत.
11 / 15
बुधवारी गाझियाबाद आणि नोएडाच्या शाळांमध्ये कोरोना संसर्गाची 12 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे चिंता वाढवत आहेत.
12 / 15
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, आरोग्य विभागाने नोएडा आणि गाझियाबादमधील शाळांमध्ये आणखी 12 नवीन कोरोना प्रकरणांची पुष्टी केली असून, गेल्या 72 तासांत एनसीआर जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या 35 झाली आहे.
13 / 15
घरी आणखी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा केला जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आहेत, परंतु त्यांची कोरोना चाचणी झालेली नाही.
14 / 15
एनसीआरच्या शाळांमध्ये सोमवारपासून आतापर्यंत कोरोनाची 35 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नोएडामध्ये 24 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांसह 27 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी गाझियाबादमधून आठ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
15 / 15
शाळांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता शाळा बंद करण्यात येत असून पुन्हा एकदा वर्ग ऑनलाइन घेतले जात आहेत. बाधित विद्यार्थ्यांना विलग करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विविध शाळांमध्ये काम केले जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली