शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनावरील उपचारात आता प्रभावी ठरू शकतं 'गंगाजल'; संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 7:45 PM

1 / 10
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,32,64,175 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 219 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,42,874 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 10
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनावरील उपचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती मिळत आहे.
3 / 10
गंगा नदीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीचं पाणी सर्वात पवित्र (Ganga River) असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आता तज्ज्ञही कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत. यातच आता कोरोनावर गंगाजल हे प्रभावी ठरू शकतं, असं एका संशोधनात समोर आलं आहे.
4 / 10
बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) डॉक्टर व्ही. एन. मिश्रा आणि डॉक्टर अभिषेक पाठक यांनी याबाबत दावा केला आहे. रविवारी (12 सप्टेंबर) प्रेस क्लबमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गंगाजल हे कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची माहिती दिली आहे.
5 / 10
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज (Bacteriophage) मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बॅक्टेरियोफेजचा अर्थ ‘बॅक्टेरिया नष्ट करणारा असा होतो. गंगेमध्ये असलेले हे बॅक्टेरियोफेजही विविध प्रकारच्या व्हायरसना नष्ट करू शकतात. यामुळेच गंगा नदीची शुद्धता कायम राहते.
6 / 10
गंगा नदीमध्ये जवळपास 1300 प्रकारचे बॅक्टेरियोफेज आढळून आले आहेत. देशातील कोणत्याही नदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियोफेज नाहीत. विशेष म्हणजे बॅक्टेरियोफेज आपल्यासाठी हानिकारक नसतात. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता हेदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
7 / 10
अरुण कुमार गुप्ता यांनी जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्वच्छ गंगा मिशनने या क्लिनिकल स्टडीबाबत निर्देश दिले होते. या अंतर्गत कोरोनावरच्या उपचारांसाठी गंगाजलाचा वापर करता येईल का याबाबत संशोधन सुरू आहे असं म्हटलं आहे.
8 / 10
गुप्ता यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल केली आहे. त्यावर केंद्र सरकारने आरोग्य विभागाला एक नोटीस जारी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी हृषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली होती.
9 / 10
तपासणीत कुठेही पाण्यात कोरोना व्हायरस आढळून आला नाही. रिसर्चमधीन ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती. बंगळुरूच्या आयआयएममधील एक निवृत्त प्राध्यापक एका एनजीओसोबत मिळून गंगाजलापासून कोरोनावरील औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
10 / 10
प्रामुख्याने बॅक्टेरियोफेजवर संशोधन करत आहेत. तसेच कोरोनाच्या काही रुग्णांवर याची चाचणीही करण्यात येत आहे. गंगाजलचा प्रयोग यशस्वी झाल्यास, गंगाजलच्या मदतीने कोट्यवधी लोकांचा उपचार करणं शक्य होणार आहे. तसेच हिंदू संस्कृतीत गंगाजलाने असाध्य रोगही बरे होतात असं म्हटलं जातं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनIndiaभारत