CoronaVirus Live Updates gwalior mp 50 passengers travelling in bus driver tested corona positive
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 50 प्रवासी असलेल्या बसचा चालक निघाला Corona Positive अन् मग झालं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 8:59 AM1 / 18कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 18देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल एक कोटीवर गेला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 3 / 18कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना देशात लसीकरण मोहिमेला देखील वेग आला आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 4 / 18तब्बल 50 प्रवासी असलेल्या बसचा चालक पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. बस चालकासह सहा प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 / 18बस चालक आणि प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच बसमधील इतर प्रवाशी प्रचंड घाबरले. त्यांना डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं असा त्रास सुरू झाला. कोरोना रुग्णांना आयसोलेट करण्यात आले आहे. 6 / 18मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर (Gwalior) महामार्गावर कोविड तपासणी पथकाकडून तपासणी सुरू होती. एका बसच्या चालकाचाच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा चालक जी बस चालवत होता त्या बसमध्ये तब्बल 50 प्रवासी प्रवास करत होते. 7 / 18गुरुवारी ग्वाल्हेर महामार्गावर कोविड मोबाईल युनिट कार्यरत होती. यावेळी शिवपूरी येथून येणाऱ्या एका लक्झरी बसला या पथकाने तांबवलं आणि सर्वांची तपासणी सुरू केली. बसमधील सर्व 51 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. 8 / 18बस चालकासोबतच इतरही पाच प्रवाशांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्वांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे.9 / 18कोरोना तपासणी नोडलचे अधिकारी डॉ. अमित रघुवंशी यांनी कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने वाढत आहे. यामुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोबाइल युनिटच्या माध्यमातून कोविड टेस्ट करण्यात येत आहे. याच पद्धतीने शिवपूरी येथून येणाऱ्या बसमधील सर्वांची तपासणी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.10 / 18तपासणीत हजीरा येथे राहणारा बस चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या बसमध्ये क्लिनर नसल्याने बस चालकानेच सर्व प्रवाशांना तिकीट दिली होती. त्यामुळे सर्व प्रवाशांचीही टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये पाच प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.11 / 18मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी मध्यप्रदेशात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10,166 नवी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेले रुग्ण आणि मृतकांचा हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे.12 / 18मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी मध्यप्रदेशात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10,166 नवी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेले रुग्ण आणि मृतकांचा हा एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे.13 / 18कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.14 / 18कोरोनाचा नवा स्ट्रेन हा आता थेट डोळे आणि कानावर अटॅक करत आहे. त्यामुळेच पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचा धक्कादायक खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे.15 / 18डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाचा थेट परिणाम हा कान आणि डोळ्यांवर होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे.16 / 18कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. एसजीपीजीआई (SGPGI) आणि केजीएमयू (KGMU) सह अनेक कोरोना रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना ऐकण्याची आणि दिसण्याची समस्या येते आहे.17 / 18रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात भरती असलेल्या अनेक रुग्णांना दिसण्याची आणि ऐकण्याची समस्या येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानाने ऐकू येत नाही. तर काही कोरोना रुग्णांनी दिसत नसल्याची तक्रार देखील केली आहे.18 / 18डॉक्टरांनी रुग्णांची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांच्या शरिरातील इतर अवयव यामुळे प्रभावित होत आहेत. अशावेळी डोळे आणि कानांवर देखील परिणाम होत आहे असं म्हटलं आहे. कोरोनाने त्याचं रूप बदललं आहे त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications