शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठी घट; रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:44 PM

1 / 13
कोरोना व्हायरसने देशात आणि जगात हाहाकार माजवला आहे. दररोज कोरोनाचे नवनवीन रुग्ण समोर येत आहेत. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येने पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 13
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 47 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 476,591,381 वर पोहोचली आहे. तर 6,128,932 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 411,940,408 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
3 / 13
कोरोनाबाबत अनेक ठिकाणी संशोधन करण्यात येत असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जगभरात वेगाने लसीकरण सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. लसीकरणाचे अनेक फायदे आहेत.
4 / 13
मेयो क्लिनिकच्या एका नवीन संशोधनात असं म्हटले आहे की कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आता अत्यंत कमी झालं आहे. लसीकरणानंतर एक हजारापैकी फक्त एक रुग्ण रुग्णालयात दाखल होतो.
5 / 13
कोरोना लसीचा लोकांना खूप फायदा झाला आहे. क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की लसीकरण झालेल्या रूग्णांचे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 0.06 टक्के होते म्हणजेच 10,000 रूग्णांपैकी सहा जण आहेत.
6 / 13
मेयो क्लिनिकमधील सेंटर फॉर द सायन्स ऑफ हेल्थ केअर डिलिव्हरीचे संशोधक प्रमुख लेखक बेंजामिन पोलक म्हणाले, 'ज्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका खूप कमी आहे.'
7 / 13
आमचा रिसर्च असे सूचित करतो की ज्या लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना देखील कोरोना होऊ शकतो, परंतु या घटना अत्यंत कमी आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
8 / 13
संशोधकांनी रोचेस्टरमधील मेयो क्लिनिकमध्ये 1,06,349 रूग्णांचा अभ्यास केला. ज्यांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होते आणि ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांनी लस देखील घेतली होती. त्यापैकी 69 रुग्णांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 13
ओमायक्रॉन सब व्हेरिएंट BA.2 जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. युरोप, चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया या देशांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संक्रमण क्षमतेबाबत एक नवीन खुलासा करण्यात आला आहे.
10 / 13
संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्णही अनेक दिवस इतरांमध्ये संसर्ग पसरवू शकतो. आत्तापर्यंत असा दावा केला जात होता की मागील व्हेरिएंटच्या तुलनेत याचा ट्रान्समिशन कालावधी कमी आहे.
11 / 13
डच व्हायरोलॉजिस्ट डॉ. मेर्जोलीन इरविन-नोस्टर हे मानायला तयार नाहीत की ओमायक्रॉन पॉझिटिव्ह लोकांचा इतरांना पॉझिटिव्ह करण्याचा कालावधी कमी असतो. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाब, 4 ते 7 दिवस संसर्ग पसरतो असं म्हटलं होतं.
12 / 13
Omicron प्रकारातही असं घडल्यास नवीन टेन्शन निर्माण होऊ शकतं. चिंतेची बाब म्हणजे अनेक देशात या व्हेरिएंटला हलक्यात घेऊन आयसोलेशनचा कालावधी हा कमी करण्यात आला आहे.
13 / 13
रिसर्चनुसार, लक्षणे दिसण्यापूर्वी दोन दिवस आधी आणि 7 दिवसांनंतर Omicron इतरांमध्ये पसरू शकतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, डॉ. मर्जोलिन यांनी अनेक प्रयोगशाळेतील अभ्यासांचा हवाला देत सात दिवस टिकून राहण्याच्या धोक्याबद्दल सांगितले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या