1 / 15जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 16 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.2 / 15देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,57,72,400 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,87,122 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.3 / 15देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,76,070 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,874 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.4 / 15अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. 5 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. 6 / 15केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल अर्धा देश म्हणजेच 50 टक्के लोक मास्क वापरतच नाही हे स्पष्ट झालं आहे. एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने केंद्र सरकारने इंडिया फाईट्स कोरोना या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आकडेवारी शेअर केली आहे.7 / 15केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं महाभयंकर संकट असलं तरी 50 टक्के लोक आताही मास्क वापरतच नाहीत. फक्त 14 टक्के लोक हे मास्क नीट लावत आहेत. 8 / 15मास्क लावणाऱ्यांपैकी 64 टक्के भारतीय मास्क तोंडावर लावतात. पण नाक उघडंच ठेवतात. त्यानंतर 20 टक्के भारतीय मास्क घालतात, पण तो तोंडावर नसून हनुवटीवर घालत असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 9 / 15दोन टक्के भारतीय तर मास्क हनुवटीवरही न लावता थेट गळ्यावर ठेवतात. या अहवालातील आकडेवारीनुसार, फक्त 14 टक्के भारतीय योग्य प्रकारे मास्क लावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये मास्कद्वारे नाक, तोंड, हनुवटी झाकली गेलेली असते. 10 / 15देशभरातील 25 शहरांमधील 2000 लोकांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी नमुना पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे.12 / 15कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत.13 / 15सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं.14 / 15देशात कोरोनाची दुसरी लाट असताना डबल मास्क वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मॅक्सच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे डॉ. रोमेल टिकू यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.15 / 15एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क वापरता येईल. एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे. असा सल्ला डॉ. रोमेल टिकू यांनी दिला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी, सुरक्षित अंतर राखणे कठीण असताना, दुहेरी मास्क वापरणे योग्य आहे.