CoronaVirus Live Updates : "देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 4:28 PM1 / 16जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्ने केले जात आहेत. 2 / 16काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. 3 / 16देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,920 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 492 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात 5 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 4 / 16देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. याच दरम्यान रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे. 5 / 16कोरोनाच्या संकटात धक्कादायक माहिती मिळत आहे. 'देशातील कोरोना मृतांचा आकडा 37 लाखांवर पोहोचू शकतो. जाहीर झालेल्या मृत्यूची अधिकृत आकडेवारी वास्तविक आकडेवारीपेक्षा 7 पट जास्त असू शकते.'6 / 16पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा मोठा दावा केला आहे. संशोधक आणि लोकसंख्या तज्ज्ञ क्रिस्टोफ गुईलमोटा यांनी महामारीमध्ये मृत्यूची संख्या भयावह पातळीपर्यंत जाऊ शकते असं म्हटलं आहे.7 / 16 मार्च 2020 पासून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 510,000 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संशोधकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे हे संशोधन केले आहे.8 / 16पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी केरळमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येचे विश्लेषण केले. वय, लिंग आणि मृत्यूची तारीख या आधारे मृत्यूचे कारण समजले. या आधारे देशातील 27 राज्यांची आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 9 / 16संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात श्रीमंत लोक राहत होते, अशा भागात हे संशोधन करण्यात आले आहे. येथील डेटा आणि परिस्थितीचे गणितीय मॉडेल्सच्या आधारे विश्लेषण करण्यात आले.10 / 16डेलीमेलच्या रिपोर्टनुसार रुग्णांच्या चाचणीच्या अभावामुळे भारतात मृत्यूची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. द इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी लेखण्यात आली आहे. प्रत्यक्षात, ही आकडेवारी वास्तविक गणनेपेक्षा 6 पट जास्त असू शकते.11 / 16ऑक्सिजनची कमतरता आणि संथ लसीकरण हे मृत्यूचे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लसीकरणाच्या डोसची ऑर्डर देण्यास होणारा विलंब हे देखील यामागे कारण आहे. त्यामुळे लोकांपर्यंत लसीचा डोस उशिरा पोहोचला. 12 / 16रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, साथीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान निष्काळजीपणामुळे मृतांची संख्या वाढली. देशातील बहुतांश राज्यांमध्ये निष्काळजीपणामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आणि मृतांचा आकडा वाढला. दुसर्या लाटेत, कोरोनामुळे बहुतेक लोकांचा मृत्यू झाला. 13 / 16संशोधक क्रिस्टोफ गुईलमोटा यांनी भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास केला आहे. दक्षिण भारताच्या लोकसंख्येवर पीएचडी केली आहे. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पुडुचेरीतून त्यांनी लोकसंख्येच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते सध्या सेंटर डी सायन्सेस ह्युमनेस, दिल्लीशी संबंधित आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 16देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती.15 / 16कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-19 लसीचा (corona vaccines) दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आहे.16 / 16केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. अशी सर्वाधिक 43 प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली. यानंतर महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications