CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:31 PM
1 / 15 जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 15 जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 137,278,683 वर गेली असून आतापर्यंत 2,959,324 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 / 15 भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 4 / 15 जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींच्या वर गेली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 5 / 15 देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1,36,89,453 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 6 / 15 देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. 7 / 15 आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,61,736 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 71 हजारांवर पोहोचला आहे. 8 / 15 देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या (JHU) आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानेस ब्राझीलला मागे टाकलं आहे. 9 / 15 ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे. 10 / 15 जगभरातील सर्वच देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15 कुंभमेळ्यात तब्बल 102 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यात पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. 12 / 15 हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 ते सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 18,169 भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल 102 साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 13 / 15 कोरोनाच्या संकटात आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे. एका अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमधील बाळाला कोरोनाची लागण झाली असून ती चिमुकली सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण आहे. 14 / 15 11 दिवसांची एक चिमुकली आपल्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. नवजात बाळ आईच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. 15 / 15 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग जास्त असून, तरुण, वृद्धांसोबतच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. दररोज येणाऱ्या नव्या बाधितांमध्ये सरासरी 5 ते 7 टक्के रुग्ण ही लहान बालके असल्याचे आढळून आले आहे. आणखी वाचा