CoronaVirus Live Updates India reports 46,164 new #COVID19 cases 607 deaths in last 24 hrs
CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाची तिसरी लाट?; फक्त 2 दिवसांत नव्या रुग्णांची संख्या झाली 'दुप्पट' By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:22 AM1 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, ब्राझीलसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 21 कोटींवर गेली आहे. 2 / 14जगभरात लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 3 कोटीचा टप्पा पार केला आहे. 3 / 14कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 4 / 14गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. 5 / 14काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 6 / 14गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली. गुरुवारी (26 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 46,164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 7 / 14607 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,25,58,530 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 436365 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,33,725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 8 / 143,17,88,440 हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान टेन्शन वाढलं आहे. कारण फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. 9 / 14मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र आज त्याच्या जवळपास दुप्पट नव्य़ा रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी (25 ऑगस्ट) 37593 नवे रुग्ण सापडले होते. 10 / 14केरळमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची सर्वाधिक संख्या ही केरळमध्ये आहे. बुधवारी केरळमध्ये 31445 रुग्ण नवे रुग्ण आढळले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता डेल्टाचं 74 टक्के संक्रमण हे लक्षणं दिसण्याआधीच झाल्याचं समोर आलं आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे.12 / 14हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे एपिडेमोलाजिस्ट बेंजामिन काउलिंग यांनी अशा परिस्थितीत कोरोनाचं संक्रमण रोखणं अत्यंत कठीण असल्याचं म्हटलं आहे. याच कारणामुळे अनेक देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे.13 / 14संशोधकांनी मे-जून दरम्यान 101 लोकांची तपासणी करण्यात आली होती. डेल्टा संक्रमित असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसण्यासाठी लागणारा वेळ हा 5.8 दिवसांचा होता. मात्र त्याआधीच कोरोनाचा प्रसार होत होता.14 / 14रिसर्चमधून ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना देखील डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications