शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 10:22 AM

1 / 15
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
2 / 15
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,19,34,455 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,070 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 491 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,27,862 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
3 / 15
कोरोना व्हायरसच्या नवनवीन व्हेरिएंटने तज्ज्ञ देखील हैराण झाले असून त्याचं टेन्शन वाढलं आहे. नवीन व्हेरिएंट आणखी समस्या वाढवत आहेत. जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.
4 / 15
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे.
5 / 15
कर्नाटकच्या (Karnataka) मंगळुरूमध्ये कोरोनाच्या एटा व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.
6 / 15
चार महिन्यांपूर्वी ही व्यक्ती कतारला गेली होती. मात्र एटा संसर्गाचं हे पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी एप्रिल 2020 मध्ये राज्यात एटा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता, असं राज्याचे नोड अधिकारी आणि कोरोना होल जीनोम सीक्वेंसिंग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.
7 / 15
तज्ज्ञांच्या मते, मंगळुरूमध्ये आढळून आलेला एटा व्हेरिएंट संक्रमण आता चिंतेचे कारण नाही. हा व्हेरिएंट आजही इओटा, कप्पा आणि लॅम्ब्डासारखा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आहे. या व्हेरिएंटबाबत अद्याप शोध सुरू आहे.
8 / 15
कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस हे व्हेरिएंट मात्र चिंतेचं कारण आहेत. या व्हेरिएंटमुळे संक्रमणाचा वेग वाढला आहे. जगभरातील अनेक देशात यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
9 / 15
कर्नाटकातील एटा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. कारण हा व्हेरिएंट जुना आहे, पण त्याची पुष्टी झालेली नाही. जर हा धोकादायक असता तर आतापर्यंत याचे बरेच केसेस दिसून आले असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना आता एक मोठा दिलासा मिळाला आहे.
11 / 15
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना तीन पट अधिक सुरक्षा मिळत असल्याचा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये याबाबत महत्त्वाचा रिसर्च करण्यात आला आहे.
12 / 15
कोरोना व्हायरसवर ब्रिटनमधील सर्वात मोठ्या रिसर्चपैकी एक असलेल्या 'रिअल टाइम असेसमेंट ऑफ कम्युनिटी ट्रान्समिशन' चा बुधवारी अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये मोलाची माहिती देण्यात आली आहे.
13 / 15
अहवालानुसार, 20 मे ते सात जून दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोना संसर्गाचा दर चारपटीने अधिक वाढला असून 0.13 टक्क्यांहून 0.63 टक्के अधिक झाला आहे. तर 12 जुलैनंतर संसर्ग दरात घट नोंदवण्यात आली.
14 / 15
लंडनच्या इम्पिरिअल कॉलेज आणि आयपीएसओएस मोरीच्या आकडेवारीनुसार, लंडनमध्ये 24 जून ते 12 जुलै दरम्यान झालेल्या संशोधनात 98 हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्यावर रिसर्च करण्यात आला.
15 / 15
रिसर्चनुसार, ज्या स्वयंसेवकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना संसर्गाची बाधा होण्याची शक्यता तीन पटीने कमी होती. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटची प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरू आहे
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतKarnatakकर्नाटकhospitalहॉस्पिटल