शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! ...तर कोरोनाची तिसरी लाट ठरेल जीवघेणी, 'ही' आहेत कारणे; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 11:08 AM

1 / 16
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 236,173,236 पोहोचली आहे तर 4,822,840 लोकांचा बळी घेतला आहे. 213,239,700 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
2 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींच्या वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 16
देशात कोरोनाचा वेग मंदावत असून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र असं असताना काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे.
4 / 16
सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
5 / 16
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
6 / 16
डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते असं म्हटलं आहे.
7 / 16
संशोधकांनी सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते.
8 / 16
तज्ञांनी अलर्ट दिला असून सुट्टीचा कालावधीत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकते आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात. संशोधकांनी 'ओपीनियन पीस' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडू शकते असं म्हटलं आहे.
9 / 16
हिमाचल प्रदेशमधील आकडेवारी दर्शवते की सामान्य सुट्टीच्या काळात पर्यटनामुळे लोकसंख्येत 40 टक्के वाढ होऊ शकते. सुट्टीचा कालावधी नसताना निर्बंध कमी करण्याच्या तुलनेत सुट्टीच्या हंगामात तिसऱ्या लाटेची शक्यता 47 टक्क्यांनी वाढू शकते आणि दोन आठवड्यांआधीच या लाटेचा पीक येऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.
10 / 16
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि अनेक राज्ये यामुळे प्रभावित झाली होती. मनाली आणि दार्जिलिंग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे उदाहरण देत संशोधकांनी सांगितले की निरीक्षणे असे दर्शवतात की ज्या भागात अधिक लोकसंख्येची प्रतिकारशक्ती अद्याप विकसित झालेली नाही तिथे संसर्गाचा वाढता धोका आहे.
11 / 16
'जबाबदार प्रवासा'चा प्रस्ताव देताना, संशोधकांनी सांगितले की मास्कचा वापर आणि पर्यटकांद्वारे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. प्रवास करणाऱ्यांनी कोरोना लस घेतली असेल तर हेदेखील तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
12 / 16
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.
13 / 16
घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
15 / 16
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.
16 / 16
कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत