CoronaVirus Live Updates omicron patients recovery rate in delhi
Omicron Variant : कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे' By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 12:00 PM1 / 15भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2 / 15देशातील रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात तब्बल 56 टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 3 / 15देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 797 आणि दिल्लीत 465 रुग्ण आहेत. 4 / 15ओमायक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 जण बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे. 5 / 15कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 6 / 15एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 रुग्ण आले आहेत. त्यापैकी 150 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. 7 / 15रुग्णांपैकी बहुतेक जणांना फक्त सौम्य लक्षणे आहेत आणि 5 ते 7 दिवसांनी डिस्चार्ज मिळत आहे. तर डेल्टाच्या काळात 14 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असे. अशा रूग्णांवर ओमायक्रॉन डेडिकेटेड हॉस्पिटल असलेल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जातात. 8 / 15रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएल गुप्ता यांनी आतापर्यंत 30 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि प्रोटोकॉलनुसार निगेटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना सोडण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरे होत आहेत. 9 / 15डेल्टामध्ये 14 दिवस लागायचे आणि बरेच रुग्ण दोन महिन्यांहून अधिक काळ दाखल होते. अशी स्थिती या प्रकरणात अद्याप दिसलेली नाही असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 10 / 15आकाश हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाचे डॉ. अक्षय बुद्धीराजा यांनी सध्या आमच्याकडे मिश्र प्रकारांचे रुग्ण येत आहेत. अशा परिस्थितीत कोणता रुग्ण डेल्टाचा आहे आणि कोणता ओमायक्रॉनचा आहे हे कळू शकत नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 15वैद्यकीयदृष्ट्या, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना आम्ही ओमायक्रॉन मानतो. ओमायक्रॉनचे रुग्ण अर्ध्या वेळेत बरे होतात. त्याचा 7 दिवसांचा आयसोलेशन कालावधी आहे. त्यांची लक्षणे 3 ते 4 दिवसांत आटोक्यात येतात. सातव्या दिवशी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असंही सांगितलं आहे. 12 / 15केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (6 जानेवारी) देशात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,876 वर पोहोचला आहे. 13 / 15देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,85,401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,43,41,009 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. 14 / 15नव्या रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण या पाच राज्यामधील आहेत. तर फक्त महाराष्ट्रात 29.19 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.15 / 15वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications