शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : वेळीच व्हा सावध! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये दिसताहेत आता कोरोनाची 'ही' 5 लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:24 PM

1 / 16
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,17,532 नवे रुग्ण आढळून आले असून 491 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
2 / 16
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने देखील चिंता वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 9,287 वर पोहोचला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
3 / 16
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाची लक्षणं फार गंभीर मानली जात नाहीत. पण भारतासह अनेक देशांना या घातक प्रकाराचा सामना करावा लागत आहे. हा व्हेरिएंट सर्व जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत सर्वाधिक संक्रामक आहे.
4 / 16
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही काही लक्षणं दिसून येत आहेत.
5 / 16
जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे.
6 / 16
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य आहेत. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत.
7 / 16
न्यूजजीपीमधील प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण 2020 मध्ये आलेल्या अल्फा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर त्याची खोकला, ताप आणि वास येणं कमी होणं अशी 3 लक्षणं खूप सामान्य होती.
8 / 16
प्रोफेसर स्पेक्टर हे ZOE कोविड स्टडीचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लाखो App युजर्सद्वारे साथीच्या आजारातील घडामोडींचा मागोवा घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट आला, तेव्हा आम्हाला त्याच्या लक्षणांमध्ये बदल दिसला.
9 / 16
अव्वल रँकिंगमध्ये असलेल्या 'अल्फा'ची लक्षणं दिसणं कमी होऊन डेल्टाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसू लागली. नाक गळणं, घसा खवखवणं आणि वारंवार शिंका येणं ही त्यांच्यात दिसणारी सामान्य लक्षणं आहेत.
10 / 16
विशेषतः ही लक्षणं पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसून आली आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याने सध्या परिस्थिती वाईट झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या प्रकाराबद्दल पाहिलं तर डेल्टा व्हेरिएंटचा ट्रेंड पुढे नेत असल्याचं दिसतं.
11 / 16
स्पेक्टर यांनी स्पष्ट केलं की, ओमायक्रॉनची लक्षणं कोणत्याही सामान्य सर्दी-पडसं आणि तापासारखी असतात आणि ही लक्षणं पूर्णपणे लसीकरण झालेल्यांमध्ये दिसून येत आहेत. लंडनमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांमध्ये लक्षणं दिसल्यानंतरच प्रोफेसर स्पेक्टर आणि त्यांच्या टीमनं हा निष्कर्ष काढला.
12 / 16
प्राथमिक विश्लेषणामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्यातील सुरुवातीच्या लक्षणांमध्ये (चाचणीनंतर तीन दिवस) कोणताही स्पष्ट फरक आढळला नाही. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची ZOE App मध्ये 5 लक्षणं नमूद केलेली आहेत.
13 / 16
लक्षणांमध्ये नाक गळणं, डोकेदुखी, थकवा (तीव्र किंवा सौम्य), शिंकणे, घसा खवखवणे या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावायला हवा की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आता भाष्य केलं आहे. भारतात सध्या पूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
15 / 16
डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावलं नुकसान पोहोचवू शकतात.
16 / 16
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य