1 / 15कोरोनामुळे देशात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 2 / 15देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 15कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.4 / 15कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे.5 / 15कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही.6 / 15मृतदेहांचे ढिग पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीत जागाच शिल्लक नाही. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना रांगेत तब्बल 20 तास वाट पाहावी लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे.7 / 15कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. स्मशानभूमीमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत की आता या स्मशानभूमींच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी याचा धसका घेतला आहे. 8 / 15नागरिकांनी सततच्या धुरामुळे श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचं सांगत स्वत:ची जीव वाचवण्यासाठी आपली घरं सोडली आहेत. अनेकांनी या त्रासामुळे दुसरीकडे राहायला जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. 9 / 15नवी दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीला लागून असलेल्या सनराइज कॉलीनीमधील परिस्थिती इतकी भयंकर आहे की येथील अनेक लोकांनी आपल्या घरांना टाळं लावून दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला आहे.10 / 15स्मशानभूमीमध्ये सतत जळणाऱ्या चितांमुळे या परिसरामध्ये सतत धूर निर्माण होत असतो. या धुराचा कॉलनीमध्ये राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींबरोबरच मुलांना आणि सर्वांनाच त्रास होऊ लागला आहे. 11 / 15परिस्थिती इतकी वाईट आहे की पूर्ण कुटुंब दुसरीकडे जाण्याचा पर्याय नसणाऱ्यांनी घरातील वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना आपल्या नातेवाईकांच्या घरी पाठवलं आहे. कॉलीनीमधील घरांच्या छप्परांवर राखेचे थर दिसून येत आहेत. 12 / 15धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याबरोबरच डोळ्यांची जळजळ होण्याची समस्याही निर्माण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या संकटामुळे येथील काहीजण घराला टाळा लावून आपल्या गावी निघून गेलेत तर काही इतर ठिकाणी राहायला गेलेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 15कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान बंगळुरूमध्ये देखील भयावह घटना समोर आली आहे.14 / 15कर्नाटकमधील बंगळुरूच्या चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क 'हाऊस फुल्ल'चा बोर्ड लावण्यात आला आहे. कोरोनामुळे अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत.15 / 15स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बोर्ड लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे.