शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 5:00 PM

1 / 10
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात आता व्हायरसबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 15 टक्के घट झाली आहे तर संसर्गाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा 9 टक्के कमी नोंदली गेली आहेत.
2 / 10
कोरोना महामारीच्या ताज्या आकडेवारीनुसार, WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 53 लाख प्रकरणे आढळली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. WHO ने सांगितले की, जगातील काही प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची नवीन प्रकरणे कमी होत आहेत.
3 / 10
आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू 183 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, तर युरोपमध्ये ते सुमारे एक तृतीयांश (33 टक्के) आणि अमेरिकेत 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
4 / 10
कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी अद्यापही अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांनी त्यांची कोरोना चाचणी कमी केली आहे आणि व्हायरसवर देखरेख ठेवण्यासाठी 'प्रोटोकॉल' पाळले जात नाहीत. फार कमी प्रकरणे बाहेर येत आहेत त्यामुळे कोरोना हा पूर्णत: संपलेला नाही.
5 / 10
WHO ने म्हटले आहे की सध्या संपूर्ण जगात संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे कोरोना व्हायरसच्या Omicron BA.5 व्हेरिएंटमधून येत आहेत आणि जगभरातील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ते 70 टक्के आहेत. गेल्या महिन्यात आलेल्या 'जीनोम सिक्वेन्सिंग'च्या अहवालानुसार, जगातील 99 टक्के प्रकरणे ओमायक्रॉनच्या विविध व्हेरिएंटची आहेत.
6 / 10
या आठवड्याच्या सुरुवातीला, फायझरने यूएस नियामक अधिकाऱ्यांना कंपनीच्या नवीन लसीला मान्यता देण्यास सांगितले, ज्याच्या मदतीने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करणे शक्य आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने लस उत्पादकांना त्यांच्या लसींमध्ये बदल करून BA.4 आणि BA.5 ला प्रतिरोधक बनवण्याचे आदेश दिले आहेत.
7 / 10
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 603,679,739 वर पोहोचली आहे. तसेच 6,480,905 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 578,534,435 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 10
कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे आणि संक्रमणाची वाढ लक्षात घेता, WHO च्या कोविड-19 तांत्रिक टीमच्या प्रमुख मारिया वान केरखोव (Maria Van Kerkhove) यांनी लोकांना भविष्यात आणखी संसर्गजन्य व्हेरिएंटबद्दल इशारा दिला आहे आणि त्यांच्यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील केलं आहे. जगभरात वेगाने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
9 / 10
WHO च्या मारिया वान केरखोव यांनी जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे आणि अनेक ट्विट केले आहेत. ट्विट करून, मारिया यांनी स्पष्ट केले की मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने कोरोना व्हायरस आणि मृत्यूचा प्रसार रोखण्यात मदत होऊ शकते. गेल्या 4 आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 15 टक्के आणि मृत्यूंमध्ये 35 टक्के वाढ झाली आहे.
10 / 10
मारिया वान केरखोव यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे आणि सध्या त्याचा सब व्हेरिएंट BA.5 चे झपाट्याने वाढणारे संक्रमण हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. यासोबतच, कोविड-19 चे नवीन प्रकार आगामी काळात अधिक संसर्गजन्य असू शकतात आणि त्याच्या तीव्रतेबद्दल अद्याप काहीही सांगता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना