शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी; मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली, रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 4:29 PM

1 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,05,02,362 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,111 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 738 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 16
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,01,050 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून विविध उपाय केले जात आहेत. देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.
3 / 16
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
4 / 16
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये तज्ज्ञांच्या विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे.
5 / 16
विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी पाहणार आहे. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सुचवतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
6 / 16
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी ठरत आहे. मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
7 / 16
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत असून मृतांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मॅक्स हेल्थकेअरच्या दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील दहा रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून ही माहिती मिळत आहे.
8 / 16
रिपोर्टनुसार, पहिल्या लाटेत 14398 आणि दुसऱ्या लाटेत 5454 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 1039 रुग्णांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढून 10.5 टक्के झाला.
9 / 16
कोरोना मृतांची संख्या ही 40 टक्क्यांनी वाढली आहे. दुसऱ्या लाटेत 45 वर्षांहून कमी वय असलेल्या रुग्णांचा अधिक मृत्यू झाला आहे. काही रुग्ण हे कोरोनासोबतच इतरही आजाराने ग्रासलेले होते.
10 / 16
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 63.4 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली. तर दुसऱ्या लाटेत 74.1 टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज होती. रुग्णांच्या रुग्णालयात उपचारासाठी राहण्याच्या कालावधीत देखील वाढ झाली आहे.
11 / 16
पहिल्या लाटेत ब्लॅक फंगसचे फक्त 10 रुग्ण आढळून आले होते. तर दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढून 169 झाली आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 16
कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
13 / 16
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 800 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 800 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे.
14 / 16
बिहार आणि दिल्लीतील सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील अनेक डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. तर काहींनी एक डोस घेतला होता. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
15 / 16
आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती डॉक्टरांचा मृत्यू झाला यावर रिसर्च सुरू आहे. तसेच यातील किती डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं याचीची माहिती घेण्यात येत आहे.
16 / 16
कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या डॉक्टरांमध्ये तरुण आणि वृद्ध डॉक्टरांचाही समावेश आहे. मात्र तरुण डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. रुग्णांवर उपचार करतानाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू